Marathi Status
लेखक - आतिश पवार
- आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण
- जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथे शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत ........
- चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात......
- जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही.....
- वेळ बदलते, आयुष्य पुढे सरकल्यावर.....आयुष्य बदलते, प्रेम झाल्यावर, प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर.....पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर.......
- "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".....
- रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते......
- ५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर "नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल ".......
- जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन....
- मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.......