सर्वांनी लक्षात ठेवावे असे...
लेखक - संतोष चोरगे
◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.
◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी.
◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.
◆ एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस पुजू नयेत.
◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपू नये.
◆ शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.
◆ देवापुढे श्रीफळ (नारळ) वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.
◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.
◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.
◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये.
◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.
◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.
◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजू नये.
◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी, दुर्वा तोडू नयेत.
◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास देवू नये.
◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे.
◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न पसरविता पंख्याने पसरावा.
◆ समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती असाव्यात, सम असू नयेत.
◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.
◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.
◆ निजलेल्या माणसास कधीही ओलांडून जावू नये.
◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.
◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसऱ्यास देवू नयेत.
◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.
◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.
◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.
◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.