लेखकाची साहित्यिक ओळख
लेखकाची साहित्यिक ओळख:
- लहानपणापासून वाचण्याची आणि लिहिण्याची, तसेच सिनेटीव्ही क्षेत्राबद्दल कमालीची आवड.
- FANTASY वाचनाची खूप आवड. अद्भुत जग आवडते.
- पूर्वी लोकमत पेपर सोबत शनिवारी "लोकमत कॉमिक्स" यायचे तसे कॉमिक्स मी स्वत: बनवून छापले जावे अशी इच्छा होती कारण drawing सुद्धा चांगले आहे. पण नंतर drawing साठी वेळ कमी पडू लागला.
- पण लिहिण्याची आवड कायम आहेच. छंद म्हणून अनेक कॉमिक्स मी लहानपणी draw केले आहेत. (रामायण आणि महाभारतावर)
- ऐतिहासिक आणि पौराणिक याक्तीरेखांची लहानपणापासून आवड.
- चाणक्य आणि कृष्ण खूप आवडतात.
- विविध वर्तमानपत्रांत पूर्वी लेख लिहिलेत (जास्त करून चित्रपटाबद्दल).
- इंटरनेट आल्यानंतर आणि मराठीत लिहिण्याची सोय झाल्यानंतर मनोगत, मिसळपाव आणि मायबोली तसेच ऐसी अक्षरे या संकेतस्थळांवर सातत्याने विविध विषयांवर लेखन.
- तसेच ईसाहित्य आणि Book Struck वर या आधी प्रकाशित झालेली "जलजीवा" खूप वाचकप्रिय कादंबरी ठरली.
- "विश्वरचनेचे अज्ञात भविष्य" ही लघु कादंबरी थोड्या हटके विषयावर आहे तो विशिष्ठ प्रकारच्या वाचकांत लोकप्रिय आहे.
- सात ते आठ लघु कथा (काही विनोदी तर उर्वरित गूढ कथा) लिहिल्या आहेत.
- मी व्यंगचित्र सुद्धा काढतो.
- वाचनाचा खूप छंद आहे.
आवडीचे लेखक: (मराठी) -
व. पु. काळे,
शिरीष काणेकर,
मुकेश माचकर,
वि.स. खांडेकर,
द्वारकानाथ संझगिरी,
जयश्री कुलकर्णी,
सुहास शिरवळकर,
रणजित देसाई,
मीना प्रभू,
नायरण धारप,
रत्नाकर मतकरी आणि बरेच काही
आवडीचे लेखक: (इंग्रजी) -
इ. एल. जेम्स,
शोभा डे,
तस्लिमा नासरिन,
चेतन भगत,
सिडनी शेल्डन,
देवदत्त पट्टनायक,
सुदीप नगरकर आणि बरेच काही
आवडीचे पुस्तक:
रामायण, महाभारत आणि चाणक्य या संदर्भातील अनेक पुस्तके
पार्टनर - व. पु. काळे
दुनियादारी- सुहास शिरवळकर
ययाती- वि.स. खांडेकर
फरासी प्रेमिक- तस्लिमा नासरिन
चाणक्य - भा. द. खेर
सिडनी शेल्डन ची सगळी पुस्तके (मूळ इंग्रजीतील)
दा विन्सी कोड - डॅन ब्राऊन
स्पाउज- शोभा डे
रत्नाकर मतकरी चे सगळे पुस्तकं
Fifty Shades of grey- E. L. James
Tell no one- Harlen Coben
That's the way we met - Sudeep Nagarkar
आणि इतर अनेक
मी लिहितो त्यामागची प्रेरणा:
१) माझे संवेदनशील मन जे वातावरणातील विविध लोकांच्या मनातील स्पंदन सतत टिपत असते, त्यांच्या मनात काय चालले असावे याचा मनात मी अंदाज बांधत असतो आणि ते इतरांना कळावे याचा खटाटोप.
२) तसेच प्रत्येक गोष्टीवर माझे स्वत:चे असे काही मत आहेत ते मी कादंबरीच्या किंवा लेखांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही विषयाची एकाच एक बाजू न बघता त्याला दुसरी आणि कदाचित तिसरीही बाजू असते ज्याकडे सर्वजण कानाडोळा करतात त्याच बाजू मला कादंबरीतील विविध पात्रांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणायच्या आहेत.
३) जर माझे मत मला व्यक्त करायला मिळाले नाही, किंवा माझ्या विधानांचा मुद्दाम विपर्यास करण्यात आला असे जर मला आढळले तर मी त्यावर लिहितो.
४) वाचकांना एका वेगळ्याच अद्भुत आणि अस्तित्वात नसलेल्या fantasy जगात घेऊन जाऊन त्यांचे मनोरंजन करणे
ड्रीम प्रोजेक्ट्स:
विविध प्रकारच्या विषयांवर मराठीत कादंबऱ्या आणायच्या आहेत. भविष्यात खालील वेगवेगळ्या विषयांवर लिहिणे आवडेल:
१) वेगळ्या पद्धतीच्या सूड कथा,
२) रहस्य, थरार, विज्ञान काल्पनिका आणि भयकथा
३) ऐतिहासिक काल्पनिका,
४) महाराष्ट्रातील अस्सल नवीन सुपरहिरो,
५) ऑफिस स्पाउज ह्या संकल्पनेवर,
६) एकत्र कुटुंब पद्धतीवर सगळ्या अंगाने विचार करणारी कादंबरी,
७) भारतातील लोक, लहान मुले, मोठी माणसं, त्यांचे सेक्स लाईफ आणि त्याचा सामाजिक जीवनावर परिणाम, तसेच त्याचे दमन आणि अतिरेक या दोघांचे दुष्परिणाम,
८) लाईफ -२४ बाय ७ (आय टी इंडस्ट्री तील कर्मचाऱ्याच्या समस्या),
९) ज्येष्ठ आणि तरुण यांच्यातील पिढीच्या अंतरामुळे होणाऱ्या वादावर सगळ्या बाजूनी प्रकाश टाकणारी कादंबरी
इत्यादी अनेक विषय मनात घोळत आहेत. फक्त जसा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे आणि परमेश्वराची इच्छा असली तर नक्की मी हे सगळे ड्रीम प्रोजेक्ट्स पूर्ण करणार!!
- निमिष सोनार, पुणे
---
लेखकाविषयी:
लेखक हे पुणे येथील Hewlett Packard Enterprise या कंपनीत Quality And Audits Manager असून लेखन हा त्यांचा आवडता छंद आहे.
लेखनाव्यतिरिक्त चित्रकला, व्यंगचित्रे काढणे, वाचन करणे तसेच पौराणिक, ऐतिहासिक आणि प्रवासवर्णने या प्रकारांत लेखकाला विशेष रुची आहे.
लेखक हे पत्नी मंजुषा, दोन मुले- अथर्व, आरोही तसेच आई वडील यांचेसह पुणे येथे रहातात.
लेखकाशी sonar.nimish@gmail.com या इमेल आयडी वर संपर्क करता येऊ शकतो.
तसेच लेखकाला खालील सोशल मीडीया वर फॉलो करू शकता:
https://twitter.com/nimishtics
https://www.facebook.com/nimishtics
लेखकाचे ब्लॉग्स:
https://nimishtics.blogspot.com/
https://aksharnimish.blogspot.in/
http://artimidis.blogspot.in/