भूकैलासा ऎसी हे केवल...
भूकैलासा ऎसी हे केवलानागरी ।
शांतादुर्गा तेथें भक्तां भवहारी ॥
असुरातें मर्दुनियां सुरवरकैवारी ।
स्मरती विधी हरि शंकर सुरगज अंतरी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय शांते जननी ।
दुर्गे बहुदु:खदमन रतलों तव भजनीं ॥ धृ. ॥
प्रबोध तुझा नव्हे विश्वाभीतरी ।
नेति नेति शद्धे गर्जति पै चारी ॥
साही शास्त्रें मथितां न कळसी निर्धारी ।
अष्टादश गर्जति परिनेणति तव थोरी ॥ जय. ॥ २ ॥
कोटीमदनरूपा ऎसी मुखशोभा ।
सर्वांगी भुषणें जांबूनदगाभा नासाग्री मुक्ताफळदिनमणिची प्रभा ॥
भक्तजनांते अभया देसी तूं अंबा ॥ जय. ॥ ३ ॥
अंबे भक्तासाठी होसी साकार ।
ना तरी जगजीवन तूं नव्हसी गोजर ॥
विराटरूपा धरूनी करिसी व्यापार ।
त्रिगुणाविरहित साहित तुज, कैचागे पार ॥ जय. ॥ ४ ॥
त्रितापतापे श्रमलों निजवी निजिसदनी अंबे सकळारंभे राका शशिवदनी ॥
अगमे निगमे दुर्गे भक्तांचे जननी ।
पद्माजी बाबाजी रमला तव भजनी ॥ जय. ॥ ५ ॥