निर्गुण जे होते ते स...
निर्गुण जे होते ते सगुण त्वां केले ।
चराचर हे अवघे तुजपासुनि झाले ॥
मायोवेष्टित जन हे ऎसे त्वां केले ।
त्रैलोक्यहि आपुल्या ऎसे त्वां केले ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय आदीशक्ती ।
आरती ओवाळूं तुज एकाग्रभक्ती ॥ धृ. ॥
ऎसे सगुणे तुजला लेणी जडितांची ।
अनेक वस्त्रे शोभति कांचन वर्णाची ॥
बैसुनि सिंहासनी नृत्यें गणिकांची ।
पाहसी तूं नयनी जननी जनकाची ॥ जय. ॥ २ ॥
हरिहरब्रह्मदिकही येती नवसांसी ।
जे जे वर मागति ते ते तूं देसी ॥
कृपाळु अंबे मातें पावसि भक्तांसी ।
परशुराम दीन करुणाकर होसी ॥ जय. ॥ ३ ॥
चराचर हे अवघे तुजपासुनि झाले ॥
मायोवेष्टित जन हे ऎसे त्वां केले ।
त्रैलोक्यहि आपुल्या ऎसे त्वां केले ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय आदीशक्ती ।
आरती ओवाळूं तुज एकाग्रभक्ती ॥ धृ. ॥
ऎसे सगुणे तुजला लेणी जडितांची ।
अनेक वस्त्रे शोभति कांचन वर्णाची ॥
बैसुनि सिंहासनी नृत्यें गणिकांची ।
पाहसी तूं नयनी जननी जनकाची ॥ जय. ॥ २ ॥
हरिहरब्रह्मदिकही येती नवसांसी ।
जे जे वर मागति ते ते तूं देसी ॥
कृपाळु अंबे मातें पावसि भक्तांसी ।
परशुराम दीन करुणाकर होसी ॥ जय. ॥ ३ ॥