जय जयवो जगदंबा अंबा सप्तश...
जय जयवो जगदंबा अंबा सप्तशृंग - वासिनी हो ।
आदिमाय चित्शक्ति व्यक्ति - मात्राचीं स्वामिनी हो ॥धृ०॥
निष्प्रपंच ब्रह्माचे ठायीं प्रगटित झाली तुझि ध्वनि हो ।
अहंब्रह्म हें बोलुनि झालिस रज - तम - सत्व तिन्हीं हो ॥
जीवेश्वर निजसत्तें निर्मित केलें अपुलेपणीं हो ।
पंचभूतातें मिळवुनि रचले ब्रह्मांडा लागुनी हो ॥१॥
जारज - श्वेदज - अंडज - उद्भिज योन्या नानापरी हो ।
समष्टि अभिमानी ईश्वर कर्ता सर्वांवरी हो ॥
ब्रह्मा - विष्णू - महेश पाळण - उत्पत्ति - क्षय करी हो ॥
इंद्र - चंद्र - भोगेंद्र केले देवयक्षकिन्नर हो ॥२॥
विद्याsविद्या शक्ति दोन्हीं तुझ्या विलक्षण हो ।
अविद्येचे योगें समूळ भूलवीलें जन हो ॥
रघुविरगुरुच्या स्वमुखें विद्यारूपें तूं प्रगटुनि हो ।
संसारीं सोडविला सर्वा परी त्वां निरंजन हो ॥३॥