तुझें स्वरुप पाहता मन माझ...
तुझें स्वरुप पाहता मन माझें रमले ।
मीतूंपण हे अवघे निरसुनियां गेले ॥
जितुके दिसे तितुके त्वद्रूप झालें ।
तुजिया प्रसादे मम अज्ञान हरलें ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय श्रीजगदंबे ।
आरती ओवाळीतों आनंदकदंबे ॥ धृ. ॥
देहाहंभाव मम अवघा मावळला ।
तुझिया स्वरूपाचा अनुभवही कळला ॥
अद्वैत सौख्याचा वाटा मिळाला ।
कामक्रोधाद्यरिं चा नाश पै झाला ॥ जय. ॥ २ ॥
जिकडे पाहें तिकडे अंबा मज भासे ।
स्मरण करिती त्यांचे भवदु:ख नासे ॥
ज्ञानाचा तो ठसा ह्रदयीं प्रकाशें ।
हरि बहु प्रेमानंदे रंगुनि गेलासे ॥ ३ ॥
मीतूंपण हे अवघे निरसुनियां गेले ॥
जितुके दिसे तितुके त्वद्रूप झालें ।
तुजिया प्रसादे मम अज्ञान हरलें ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय श्रीजगदंबे ।
आरती ओवाळीतों आनंदकदंबे ॥ धृ. ॥
देहाहंभाव मम अवघा मावळला ।
तुझिया स्वरूपाचा अनुभवही कळला ॥
अद्वैत सौख्याचा वाटा मिळाला ।
कामक्रोधाद्यरिं चा नाश पै झाला ॥ जय. ॥ २ ॥
जिकडे पाहें तिकडे अंबा मज भासे ।
स्मरण करिती त्यांचे भवदु:ख नासे ॥
ज्ञानाचा तो ठसा ह्रदयीं प्रकाशें ।
हरि बहु प्रेमानंदे रंगुनि गेलासे ॥ ३ ॥