मूळपीठ यमुनागारी । म...
मूळपीठ यमुनागारी । माता आदिकुमारी ॥
नेसली पितांबर उभा राहे शिखरीं । भक्ताचीं वाट पाहे ॥
कर निढळावरी ॥ १ ॥ जय देवी आदिमातें ॥
जय हो कृपावंते ॥ आरती ओवाळीन ।
एक मनोभावे चित्तें ॥ धृ. ॥
मळवट कस्तुरीचा । गळा हार रत्नांचा ॥
त्रिशूळ डमरू हातीं । गर्व हरिला दैत्यांचा ॥
वधिला महिषासुर । थोर प्रताप भूजांचा ॥ जय. ॥ २ ॥
शृंगार जडित लेणे । कटडियांची भूषणे ॥
अंदुवा झणत्कार । ढाळ देती रत्नांचा ॥
पाईचे पोल्हार । वाजती रुणझुण ॥ जय. ॥ ३ ॥
वळली हे कामधेनू । पय दाटले स्तनी ॥
अगम्य महिमा तुझा । वर्णिती वेदपुराणी ॥
यालागी माते चरणी । शरण आलो लोटांगणी ॥ जय. ॥ ४ ॥
तव रूप वर्ण अंबा । माझा केवढा केवा ॥
वर्णितां मोक्ष होय । भक्त चरणी राखावा ॥
वेडा हा विप्रदास । तुझें चरणीं असावा ॥ जय. ॥ ५ ॥