मंगळागौरी नाम तुझे ।...
मंगळागौरी नाम तुझे । तुला नमन असो माझे ॥
भवदु:खाचे हे ओझे । देवी उतरावे सहजे ॥ १ ॥
जय माये मंगळागौरी ।तुजला पुजूं अंतरी ॥
नाना विधिउपचारी । दीप ओवाळूं सुंदर ॥ धृ. ॥
गजाननाची तूं माता ।शंकराची प्रिय कांता ॥
हिमचलाची तूं दुहिता ।मज तारिं तारिं आतां ॥ जय. ॥ २ ॥
लागे तुझ्या चरणाशी ।जाळी पापांचिया राशी ।
भक्ति ठसावी मानसी ।अंबे न्यावे पायांपाशी ॥ जय. ॥ ३ ॥
गौरी ओवाळित्ये दीप ।नेणें तुझे नामरूप ॥
वाढवावे सौभाग्य अमूप ।विश्वाची तूं मायबाप ॥जय. माये. ॥ ४ ॥
रिकामी ही खटपट ॥शुद्धमार्गी लावी नीट ॥
परब्रह्मा घनदाट । द्यावी नारायणी भेट ॥ जय. ॥ ५ ॥