जय जय परमानंदे महामा...
जय जय परमानंदे महामाये शांते ।
पंचारती ओवाळूं तव पदिं कुळनाथे ॥ धृ. ॥
स्वेच्छें ब्रह्म तूं कौतुकनट क्रीडनकामे ।
धरुनी सगुणरुपा रजिली त्रयधामे ॥
विविधात्मे विरचुनिं त्यां भोगवि कृतकर्मे ।
निजरूप करिसी दावुनि पुनरपि निजवर्मे ॥ जय. ॥ १ ॥
त्या तव निजरुपातें शोधित घटमठ हा ।
चारि सहा दश द्वादश षोडश द्विदलां हां ।
पाहतां सदयें गुरुरूप भासविले जेव्हां ॥
निजरुपपंथ केला सुगमागम तेव्हां ॥ जय. ॥ २ ॥
तो तू भार्गवराम द्विजकुळगुरु त्राता ।
दशशतदळ केळोसी सुखधामी नेता ॥
तेथे शांतादुर्गा अद्वय हे माता ॥
पाहुनि तन्मय तल्लिन हरली भवचिंता ॥ जय. ॥ ३ ॥
तापत्रयजाचणिने तापलि तनु पूर्ती ।
तेंव्हा स्वियकरुणें मनि प्रगटलि हे मूर्ती ॥
कुरवाळूनि आश्वासी दानी मनतृप्ती ।
मंगेशात्मज तल्लिन तत्पदिं समचित्ती ॥ जय. ॥ ४ ॥