जय देवी जय देवी जय म...
जय देवी जय देवी जय माहेश्वरी ।
आरती ओवाळूं तुज योगेश्वरी ॥ धृ. ॥
श्वासोच्छ्वास अवघा तुझिये स्वाधीन ।
ज्ञानेद्रियी तेव्हां तुजलाची ज्ञान ॥
कर्मेंद्रियी अवघे तव कर्माचरण ।
अंतर्मनें करिसी तूंची जगरचन ॥ जय. ॥ १ ॥
तुझिया ज्ञानाअंगे मी तो सज्ञान ।
तुझिया अज्ञानांगे मी तो अज्ञान ॥
कर्मोपासकज्ञान तव नाटक पूर्ण ।
व्यर्थचि मीपण माझा देहाभिमान ॥ जय. ॥ २ ॥
अनंतब्रह्मांडे ती तूंची होसी ।
अंत:करणद्वारें तूंची हो स्फुरसी ॥
जन्ममृत्यूसंसृति तूंचि हो वहासि ॥
बाळा व्यर्थचि मीपन माझी आसोशी ॥ जय. ॥ ३ ॥
आरती ओवाळूं तुज योगेश्वरी ॥ धृ. ॥
श्वासोच्छ्वास अवघा तुझिये स्वाधीन ।
ज्ञानेद्रियी तेव्हां तुजलाची ज्ञान ॥
कर्मेंद्रियी अवघे तव कर्माचरण ।
अंतर्मनें करिसी तूंची जगरचन ॥ जय. ॥ १ ॥
तुझिया ज्ञानाअंगे मी तो सज्ञान ।
तुझिया अज्ञानांगे मी तो अज्ञान ॥
कर्मोपासकज्ञान तव नाटक पूर्ण ।
व्यर्थचि मीपण माझा देहाभिमान ॥ जय. ॥ २ ॥
अनंतब्रह्मांडे ती तूंची होसी ।
अंत:करणद्वारें तूंची हो स्फुरसी ॥
जन्ममृत्यूसंसृति तूंचि हो वहासि ॥
बाळा व्यर्थचि मीपन माझी आसोशी ॥ जय. ॥ ३ ॥