जय देवी जय जय दुर्गे...
जय देवी जय जय दुर्गे माते आदिभवानी चिच्छक्ते ।
पंचारति तुज प्रेमे करितो तन मन अर्पूनि कुळनाथे ॥ धृ. ॥
तव कृपेविण जपतपादी कांही न पावति सिद्धितें ।
प्रसन्न होतां भवभयबाधा कधीहि न बाधे भक्तातें ॥
तव इच्छेविण बोधेना कधी वेदसारही शेषातें ।
जाणुनि हें तव चरणी शरण बहु षड्रिपु वारी मम माते ॥
विठ्ठलसुत बलवत्कवि विनवी मान्य करी मम वचनातें ।
इष्ट हेतु मम पुरवुनि अंती मिळवी तव निजतत्वातें ॥ जय. ॥ १ ॥