ज्ञानराज माझा योग्यांची म...
ज्ञानराज माझा योग्यांची माउली । जेणें निगमावली प्रगट केली ॥१॥
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव तारावया ॥२॥
गीता अलंकारी नामें ज्ञानेश्वरी । ब्रम्हानंद लहरी प्रगटली ॥३॥
श्रवणाच्या मिसें बैसावें येवोनी । समरस होवोनी सुखें नांदा ॥४॥
अध्यात्म विद्येचें करुनियां रुप । उजळिला दीप चैतन्याचा ॥५॥
तुका म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥