कौतुकाची वाणी बोलूं तुज ल...
कौतुकाची वाणी बोलूं तुज लाडें । आरुष वांकुडें करुनी मुख ॥१॥
दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननी बाळकामध्यें भेद ॥२॥
सलगी दुरुनी जवळी पाचारुं । धावोनियां करुं अंगसंग ॥३॥
धरुनी पाउलें मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥४॥
तुका म्हणे तुज आमुचीच गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥५॥