आम्हासी आपुलें नावडे संचि...
आम्हासी आपुलें नावडे संचित । चडफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥
न कळतां झाला खोळंबा मारगा । जगीं झालों जगा बहुरुपी ॥२॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरें ॥३॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरी नारायणा उडी घाला ॥४॥