Get it on Google Play
Download on the App Store

वास्तुशास्त्राचा उगम

वास्तुशास्त्र हे अत्यंत प्रगल्भ असे पौराणिक काळातील शास्त्र आहे. त्याचा  उगम अथर्ववेदात आढळतो. अथर्व वेदाचे एक अंग आहे स्थापत्यवेद. वेद हे अर्थातच जगन्मान्य आहेत आणि त्यांची महती सर्व जण मान्य करतात . आपल्या भारताचा तो एक बहुमोल ठेवा आहे. विश्वाच्या अनेक रहस्यांचा उहापोह आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी कितीतरी अगोदर करून ठेवला आहे. ज्या रहस्यांची उकल करताना पाश्चात्यशास्त्रज्ञ अगदी काही शतकांपूर्वी चाचपडत होते. आपल्या ऋषीमुनींनी अनेक शास्त्रांचा कसून अभ्यास केला आणि त्यांची उपयुक्तता यथायोग्य रीतीने आपल्यासमोर प्रस्तुत केली त्यापैकी एक बहुमोल रत्न म्हणजे वास्तुशास्त्र.

वास्तुशास्त्र हे जगात कुठेही लागू पडणारे शास्त्र आहे. आठ दिशा  आणि  पंचमहाभूते यांचा सुयोग्य समतोल या शास्त्रात अग्रस्थानी ठेवला आहे. वास्तूशास्त्रात दिशा,भूखंडाचा आकार आणि प्रकार यांना फार महत्व आहे. त्याचप्रमाणे वास्तुमधील अंतर्गत संरचनेला देखील अत्याधिक महत्व आहे.

आपल्या आयुष्यातील दु:ख, क्लेश, अपयश, दुर्दैव, आजार, आर्थिक नुकसान,कम नशिबी आयुष्य या सगळ्या गोष्टींचे मुख्य कारण आपण राहत असलेल्या वास्तुमध्येच आहे याची अनेकांना जाणीव नसते. आणि म्हणूनच ह्या गोष्टींवर उपाययोजना करता यावी म्हणून आपल्या  ऋषीमुनींनी ‘वास्तूशास्त्र’ विकसित केले. ज्यायोगे सुख, समृद्धी आणि विकास साधता येऊ शकेल. जर आपण राहत असलेल्या वास्तुमध्ये वास्तुशास्त्रातील सिद्धांत पाळले तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आणि विवंचना यांच्यावर मात करता येऊ शकेल.अष्टदिशा व पंचमहाभूते यांचे संतुलन जर का आपल्या वास्तूत स्थापन झाले असेल तर नैसर्गिकरित्या वास्तूमध्ये उर्जेचा समतोल साध्य होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यात जाणवतो.

संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला

महाकाल
Chapters
भूमिका वास्तुशास्त्राचा इतिहास वास्तुशास्त्राचा उगम वास्तुशास्त्र- शास्त्र कि थोतांड? वास्तुशास्त्राची गरज काय? वास्तुशास्त्राचे फायदे योग्य भूखंडाची निवड कोणते भूखंड टाळावेत ? भूखंडाचा आकार बांधकाम रस्ता विहीर कुंपण आवारातील रचना व्यावहारिक द़ृष्टिकोन मुहूर्तशास्त्र प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार कोपरारहित भूखंड कोपरा वाढीव असलेले भूखंड वास्तू बांधताना घ्यावयाची काळजी वास्तुपुरुष विथिशुला देवघर दिवाणखाना अथवा हॉल स्वयंपाकघर किंवा किचन शयनकक्ष किंवा बेडरूम बाथरूम शौचालय किंवा संडास : अभ्यासिका किंवा स्टडी रूम तिजोरी स्टोअर रूम जीना बाल्कनी आणि टेरेस अंतर्गत दरवाजे ब्रह्मस्थान पुढील भागात