जीना
जिन्याची रचना दक्षिण, वायव्य किंवा नैऋत्य कोपऱ्यात असावी. जीना पश्चिम किंवा दक्षिण दिशेत चढणारा असावा व उतार पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. पायऱ्यांची संख्या 9, 11, 13, 15, 17 वगैरे अशी विषम संख्या असावी. जीना चौकोनी आकाराचा असावा. त्यात दोन टप्पे असावेत. गोल, चक्राकार असा जिना नसावा नयेत.
देवघर जिन्याखाली नसावे. जिन्याखाली डायनिंग टेबल,अभ्यासाचे टेबल, पुस्तकांचा रॅक कधीही नसावे. जीना चढा उतरायला सोपा असावा आणि तो घसरडा नसावा.