अभ्यासिका किंवा स्टडी रूम
स्टडी रूम पश्चिम दिशेला असावी. स्टडी टेबल असे मांडावे की बसल्यावर अभ्यास करताना तोंड पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असले पाहिजे. देवाचा फोटो ईशान्य दिशेला लावावा. जड वस्तू आणि अडगळीचे सामान अभ्यासिकेत नसावे. प्रकाश भरपूर असावा. हवा खेळती असावी. या खोलीत शौचालय नसावे. पुस्तकांचे कपाट वायव्य किंवा नैऋत्येला ठेवावे. रंगसंगती डोळ्यांना आनंद देणारी असावी. भडक रंग नसावेत. त्यामुळे अभ्यास करताना मन एकाग्र होत नाही. वातावरण प्रसन्न असावे. खोली स्वच्छ आणि टापटीप असावी. या खोलीचा वापर अभ्यासासाठीच व्हावा. अडगळीची खोली किंवा तत्सम वापर करू नये.