तिजोरी
तिजोरीची व्यवस्था वास्तूच्या उत्तर दिशेला करावी. तिजोरी ती उत्तरेकडे तोंड करून उघडणारी असावी. ‘कुबेर’ उत्तर दिशेचा दिशापालक आहे. तिजोरीच्या खोलीत दार पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. स्वतंत्र खोली नसेल तर किंवा तिजोरी नसेल तर मजबूत कपाट तिजोरी म्हणून वापरता येते. मात्र कपाट वरील नियमापनुसार असावे.
तिजोरीत पश्चिम दिशेला मौल्यवान वस्तू, सोने, दागिने, नाणी ठेवावीत. तिजोरीवर किंवा कपाटावर जड सामान ठेवू नये. तिच्या भिंतीवर जळमट लागू देऊ नयेत ती साफ करावीत. तिजोरी प्रवेशद्वार किंवा इतर दारासमोर नसावी. तिजोरीवर बाहेरच्या लोकांची नजर पडू नये नये. तिजोरीसमोर देवी देवता यांच्या नसाव्यात. तिजोरी बीमच्या खाली ठेवू नये.