कोणते भूखंड टाळावेत ?
स्मशानाच्या जागेवरचा भूखंड कधीही घेऊ नये. स्मशानाच्या आसपास देखील भूखंड नसावा. एखाद्या जागेवर कुणाचा अनैसर्गिक पद्धतीने मृत्यु झाला असेल, उदाहरणार्थ अपघात, आजार, खून, आत्महत्या वगैरे. तर शक्यतो अशी जागा घेणे टाळावे. अशा जागेत पिशाच्च योनी अथवा अतृप्त आत्म्यांचा त्रास सहन करावा लागतो. आणि हा त्रास त्या जागेवर राहणाऱ्या सर्वाना होतो.
पूलाजवळील भूखंड खरेदी करू नये. पूल जर उत्त्तर दिशेत किंवा पूर्वे दिशेस असेल तर असा भूखंड निश्चितपणे टाळावा. दक्षिण किंवा पश्चिमे दिशेकडे पूल असेल भूखंड घेण्यास हरकत नाही.
जर भूखंडात विहीर असेल आणि तिची व्याप्ती शेजारच्या भूखंडावरही असेल तर असा भूखंड टाळावा.
भूखंड टेकडीवर नसावा. भूखंड जर टेकडी शेजारी किंवा पर्वतानजीक असेल व त्याचा उतार उत्तर अथवा पूर्वेकडे असेल तर असा भूखंड घेण्यास हरकत नाही.