बांधकाम
इमारतीचे बांधकाम सुरु करण्याआधी चांगला मुहुर्त पाहूनच सुरुवात करावी. त्याआधी भूमीपूजन करणे आवश्यक आहे.
खोदकाम, पायाभरणी या सर्व गोष्टी रितसर कराव्यात. एकदा बांधकाम सुरू झाले की, ते थांबावू नये.
बांधकाम सुरु करताना प्रथम विहीर किंवा बोरवेल यांची व्यवस्था करावी,
नंतर बांधकाम साहित्यासाठी लागणारी खोली, मग कुंपणाच्या भिंती या क्रमाने बांधकाम करावे.
सूर्यास्त होताच मजूर लोकांनी कामं थांबवावीत. रात्रीचे वेळी बांधकाम करू नये.