देवघर
देवघर ईशान्य दिशेस असावे. जर ईशान्य कोपऱ्यात शक्य नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाही देवघर करू शकतो. दक्षिण दिशेकडचे देवघर टाळावे. देवघर बेडरूममध्ये नसावे. देवघरावर किंवा खाली संडास किंवा बाथरूम असू नये. देवघरात आग्नेय कोपऱ्यात दिवा, समई, उदबत्ती, धूप लावावा. पूजा करताना देवाच्या बरोबर समोर बसू नये. उजव्या अथवा डाव्या बाजूला बसावे. देवघरात मेलेल्या माणसांचे फोटो नसावेत. भग्न झालेली मोडलेली, मूर्ती ठेवू नये. एका देवाच्या अनेक मूर्ती किंवा फोटो नसावेत. देवघर जमिनीपासून शक्यतो थोडेसे उंच असावे. काळा कडप्पा वापरू नये. लाकूड, संगमरवर वापरण्यास हरकत नाही.
गरज नसलेले सामान देवघरात ठेवू नये. देवघर बांधणे शक्य नसेल त्यांनी ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर भिंतीला तसबीर ठेवावी आणि चौरंगावर देवाच्या प्रतिमा स्थापन कराव्यात. देवघरात नेहमी नंदादीप प्रज ठेवावा. वातावरण प्रसन्न ठेवावे. वास्तूमध्ये देवघरासाठी खास जागा करावी.