शौचालय किंवा संडास :
वास्तूच्या दक्षिण, पश्चिम भागात शौचालय असावे.
संडासचे भांडे किंवा कमोड अशा प्रकारे बसवावा कि बसताना तोंड उत्तरे किंवा पूर्व दिशेकडे असावे.
उत्तरेकडे नळ असावा.
संडासचा दरवाजा पूर्व किंवा आग्नेय दिशेला उघडावा. दरवाजा सतत बंद असावा.
सफाईचे सामान, अॅसिड, फिनेल, ब्रश वगैरें दक्षिणेत ठेवावे व्यवस्था करावी.
सेफ्टीक टँक पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.
कोंदटपणा वाटू नये. हवा खेळती रहावी.
वृद्ध व्यक्तींना त्रासदायक रचना करून नये. टाईल्स निसरड्या नसाव्यात.
संडासात भरपूर प्रकाश असावा