स्टोअर रूम
स्टोअर रूम नैऋत्य दिशेला असावी. अडगळ, जड सामान दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे.
आग्नेय कोपऱ्यात रॉकेल, सिलेंडर,तेलाचा डबा वगैरे ठेवावे. झोपण्यासाठी किंवा इतर कामांसाठी स्टोअर रूमचा वापर कधीही करू नये.
सध्या न वापरायचे सामान, अडगळ ठेवण्यासाठीच स्टोअर रूमचा वापर करावा. उगीचच अनावश्यक वस्तू साठवून ठेवू नये. जुने सामान वापरात नसेल तर गरजूंना देऊन टाकावे.