Get it on Google Play
Download on the App Store

लावणी ४१ वी

जन्मवरी सुखसोहळे उभयतां केले नाना परी ।
छंद सुटेना आतां घडो तुजपाईं कैचे तरी ॥धृ०॥
वेळ घडीचा गुण, धन्य सृष्टीकर्त्याची कॄती ।
होणार्‍यासारख्या गांठि गडे पडल्या दैवागती ।
निधान सौख्यामधें गोड वाटसी ह्रदयांतर्गती ।
स्त्रीधार्मीं रत अशी तूंच या कलीयुगामधें सती ।
नाहि व्यंग अष्टांग पाहतां उणें कुठे तिळरती ।
बरि षड्‌गुण प्रीतिची मिळालिस तूं कांता गुणवती ।
द्वयकुळ उद्धारलों, सखे तूं केवळ सुखवाहिनी ।
स्त्रीपणांत अति योग्य, सगुण, सौम्य रूप, वरदायिनी ।
पाहावें ना, तुजपाईं केली सर्वस्वाची हानी ।
अग सखे अवडलिस म्हणुन लागलों छंदीं ।
जाहलों व्यसनाधीन, प्राण घातला बंदीं
जन्मतां अतां तूं अमची शरिरसंमंधी ।
चिरकाल लोभ चालुं दे इंशुनया पुढता
कोणते विषइचा मनिं संशय धरुं नको ।
वाढला द्वेषा औघ्यासी वाइट जाहलों ।
तूं तरी येकटी मन निष्ठुर करुं नको ।
स्तव करुनि ह्रदयिं पदरांत ईश्वरापाशीं
मागणें हेंच की आमचे अधीं मरुं नको ।
घडि घडि आठवण होतां रूपध्यान ह्रदयीं, स्मरतों गे ।
न गमे, वेडयावाणी मग भलत्या भरिं भरतों गे ।
आर्जव प्रीतीसाठीं श्रीमंतापरि करितों गे ।
सोडून धंदे सारे तुजमागें आम्ही फिरतों ।
घरिं आपल्या अन्नपाणी पक्ष्यावाणी चरतों ।
तव सुखिं प्रपंचाचें दु:ख सारेंच विसरतों ।
स्तन धरितों झोपेंत, न कळतां तुझी सोडितों निरी ॥१॥
कोण कोणाचे आपण ? गांठ पडली स्नेहाच्यामुळें ।
सुख पाहुन मग तुझें झालों भावाबंदावेगळें ।
वरकड निर्गुण स्त्रिया पाहतां वमनापरि कळमळे ।
नावडती त्या सखे, तुसाठीं जिव अंतरिं तळमळे ।
देह निर्मळ नागिणीपरिस लवचिकें शरिर कोवळें ।
न सोडावी वाटते, येके ठाईं बांधावे गळे ।
बारमाही सारखी सुखे तुजजवळ जीव निद्रा करी ।
येकवक्त चुकतांच विषय थैमान करी अंतरीं ।
नको प्रवासीं जाणें, द्रव्य वाटतें मृत्तिकेपरी ।
तुजविण गोड गडे आणखी कांही दिसेना ।
भृंशलें चित्त, संसारावरी बसेना ।
हरविषयीं गरज घरदाराची ग असेना ।
प्रीतीचें तुझ्या सुख पाहातां अंतर्ध्यानीं ।
वाटती जणुं हात स्वर्गाला लागले ।
धृवपदासारखी ममता अढळ असूंदे
भोगुन दुर व्हावें, हें नसें चांगले ।
विषयानें पीडितां तुझी गडे पाठ निघालों
दुर लोटूं नकोस सांभाळ वचन मागलें. ।
यावर अंतर देतां गति नाहीं मग बरिसी ।
निष्ठुरपणिं येकांतीं कां गे रागें भरसी ? ।
अमान्य वचन आमचें जें करुं नये तें करसी ।
जातिवंत म्हणतांना अवजातीमध्यें शिरसी ।
लटक्या उचलुन करिं दिधल्या त्वां करिं कोमल तुळसी ।
अर्पण केले फिरतां पहा पापामध्यें जळसी ।
कां गे कंटाळसी स्वस्थ राहुनिया आपले घरीं ? ॥२॥
कांहिं चांगलें नसे तुला द्यावेंसें आमचेपशीं ।
जिव देतो, धे गडे, जशी चंद्राला वाहावी दशी ।
दांतओठ आपले आपण, कां गे निर्फळ निंदिशी ? ।
पदरामधे घेतलें, अतां सोडुन कैसी नांदसी ? ।
जन्मापुन बाळगला रावा, कां मारुन टाकसी ? ।
नये क्रियेला टळूं, उभा गडे परमेश्वर पाठिशीं ।
विषयी होऊन दीन, मुखिं तृण धरिलें दांतामधें ।
सारा वेळ तुजकडे लक्ष अमचें एकांतामधें ।
मन झाले गोसावी, नको राहणे लोकांतामधें ।
परदेशीं तुला निस्पृह घेउन दुर जावें ।
राहिले होष चित्ताचे फेडुन घ्यावे ।
वाटतें तुझ्या उच्छिष्ट मुखांतिल खावें ।
अंगुष्ट नखें करतळ नग निर्मळ सारी ।
लाउन भाळिं आडव्या कुंकाची चिरी ।
नेसणें शरिर आच्छादुन मर्यादेनें ।
भोगोतां तुझ्या लुगडयाची न ढळे निरी ।
राहिले सगुण याविरहित शोधुन पहातां
अतर्क मति कविच्या झाल्या अंतरीं ।
वर्तुळ चंदावाणी, मुखचंद्रकळा चढती ।
गुह्यांतरिं गुण सारे बाहिर दृष्टि न पडती ।
अशि प्राप्त होतां वाहे प्रारब्धाची बढती ।
तुजविण गरिबावाणी हे नेत्र गडे रडती ।
निर्मूळ पुरती करुंदे या विषयाची झडती ।
स्नेहनात्याच्या योगें ज्या त्या गोष्टी घडती ।
देहतरुवर वाढती, नको छेदुन टाकूं मंजिरी ।
आतां तुझा तुजकडे दोष येइला पापाचा शिरीं ॥३॥
कां करितां प्रार्थना ? मी तुमच्या उपकारीं वाढले ।
आतां बायको जशी तुम्हांला, अक्षइ कर जोडले ।
आसलाईच्या मुळें पाश या काजचे (?) तोडिले ।
सापडले वचनांत, अतां सोडा मागिल पुढलें ।
पहिल्यानें भोगुन तुम्ही पतिव्रत माझें मोडिलें ।
सावध व्हावें तुम्हीच आतां, मी भय सारेंच सोडिलें ।
निश्चय तुमचा फार कठिण, पाहतां झाली सीमा ।
प्राचीन अपराधाची करा मजवर यावरती क्षमा ।
स्नेहें संकुळ दिनमणी, किति रिझवून दावावें तुम्हां ? ।
भय धरूं नका, मी कन्या कुळवंताची ।
लावीन उभयतां ही तड स्नेहाची ।
पण तुम्ही दाखवा वाट पुढिल पंथाची ।
संपतां विषय मन काढुं नका मजवरलें
बोललें आपलें करावें खरें ।
जिव दिला, आतां समसमान चित्त असावें
वाजते कोठें तरि टाळी येक्या करें ? ।
वायली नका म्हणूं आपला प्राण आहे तों
कर असे सख्या, कीं सर्वां ज्यामधें बरें ।
प्रारंभीं तर केव्हां मन सत्वाला ढळलें ।
खाउन निंदुं नका हो घ्या भलतेसें मिळलें ।
आपले मर्जीसाठीं व्रतनेमाला चळले ।
मर्जीचें मन आपल्या मजला पुरतें कळलें ।
येथुन संशय सारे कपटाईचे जळले ।
होनाजी बाळा म्हणे, पुढें अंतरीं निश्चय बळकट धरी ।
देतों शाबासकी, धन्य तू कांता सृष्टीवरी ॥४॥

लावणी

संकलित
Chapters
लावणी १ ली लावणी २ री लावणी ३ री लावणी ४ थी लावणी ५ वी लावणी ६ वी लावणी ७ वी लावणी ८ वी लावणी ९ वी लावणी १० वी लावणी ११ वी लावणी १२ वी लावणी १३ वी लावणी १४ वी लावणी १५ वी लावणी १६ वी लावणी १७ वी लावणी १८ वी लावणी १९ वी लावणी २० वी लावणी २१ वी लावणी २२ वी लावणी २३ वी लावणी २४ वी लावणी २५ वी लावणी २६ वी लावणी २७ वी लावणी २८ वी लावणी २९ वी लावणी ३० वी लावणी ३१ वी लावणी ३२ वी लावणी ३३ वी लावणी ३४ वी लावणी ३५ वी लावणी ३६ वी लावणी ३७ वी लावणी ३८ वी लावणी ३९ वी लावणी ४० वी लावणी ४१ वी लावणी ४२ वी लावणी ४३ वी लावणी ४४ वी लावणी ४५ वी लावणी ४६ वी लावणी ४७ वी लावणी ४८ वी लावणी ४९ वी लावणी ५० वी लावणी ५१ वी लावणी ५२ वी लावणी ५३ वी लावणी ५४ वी लावणी ५५ वी लावणी ५६ वी लावणी ५७ वी लावणी ५८ वी लावणी ५९ वी लावणी ६० वी लावणी ६१ वी लावणी ६२ वी लावणी ६३ वी लावणी ६४ वी लावणी ६५ वी लावणी ६६ वी लावणी ६७ वी लावणी ६८ वी लावणी ६९ वी लावणी ७० वी लावणी ७१ वी लावणी ७२ वी लावणी ७३ वी लावणी ७४ वी लावणी ७५ वी लावणी ७६ वी लावणी ७७ वी लावणी ७८ वी लावणी ७९ वी लावणी ८० वी लावणी ८१ वी लावणी ८२ वी लावणी ८३ वी लावणी ८४ वी लावणी ८५ वी लावणी ८६ वी लावणी ८७ वी लावणी ८८ वी लावणी ८९ वी लावणी ९० वी लावणी ९१ वी लावणी ९२ वी लावणी ९३ वी लावणी ९४ वी लावणी ९५ वी लावणी ९६ वी लावणी ९७ वी लावणी ९८ वी लावणी ९९ वी लावणी १०० वी लावणी १०१ वी लावणी १०२ वी लावणी १०३ वी लावणी १०४ वी लावणी १०५ वी लावणी १०६ वी लावणी १०७ वी लावणी १०८ वी लावणी १०९ वी लावणी ११० वी लावणी १११ वी लावणी ११२ वी लावणी ११३ वी लावणी ११४ वी लावणी ११६ वी लावणी ११७ वी लावणी ११८ वी लावणी ११९ वी लावणी १२० वी लावणी १२१ वी लावणी १२२ वी लावणी १२३ वी लावणी १२४ वी लावणी १२५ वी लावणी १२६ वी लावणी १२७ वी लावणी १२८ वी आत्माराम लावणी १३० वी लावणी १३१ वी लावणी १३२ वी लावणी १३३ वी लावणी १३४ वी लावणी १३५ वी लावणी १३६ वी लावणी १३७ वी लावणी १३८ वी लावणी १३९ वी लावणी १४० वी लावणी १४१ वी सु भा न लावणी १४३ वी लावणी १४४ वी लावणी १४५ वी लावणी १४६ वी लावणी १४७ वी लावणी १४८ वी लावणी १४९ वी लावणी १५० वी लावणी १५१ वी लावणी १५२ वी लावणी १५३ वी लावणी १५४ वी लावणी १५५ वी लावणी १५६ वी लावणी १५७ वी लावणी १५८ वी लावणी १५९ वी लावणी १६० वी लावणी १६१ वी लावणी १६२ वी लावणी १६३ वी लावणी १६४ वी लावणी १६५ वी लावणी १६६ वी लावणी १६७ वी लावणी १६८ वी लावणी १६९ वी लावणी १७० वी लावणी १७१ वी लावणी १७२ वी लावणी १७३ वी लावणी १७४ वी लावणी १९३ वी लावणी १९४ वी लावणी १९५ वी लावणी १९६ वी लावणी १९७ वी लावणी १९८ वी लावणी १९९ वी