लावणी ५९ वी
जन्मवर बांधली मी तुमची अशी म्हणते नेहमीं ।
तरी मशि कां हो वाकडे तुम्ही ? ॥धृ०॥
सुखी असा हो, मशि दु:खाचे दिवस घालवूं नका ।
चित्त बाराकडे लावूं नका ।
बालमित्र मम प्राणप्रीतिच्या माझ्या अर्धेलिका ।
तुला घडि घडि घडि म्हणते सखा ।
मी मैना सकुमार, नवाजिक तूं पोपट बोलका ।
गोड नांवानें मारिते हाका ।
विनयमूर्ति जशी तुम्हांला घ्या सापडले रेशमी ॥१॥
नको निफळ मशिं रुसुं, तुम्हि मला सौभाग्याचे निधी ।
कारणें शीर वाहिलें पदीं ।
ठेवुन हातचें काम तुमच्याजवळ येते मी अधी ।
तरी कां मग म्हणता हो जुदी ? ।
जें अवघड सांगतां त्यास मी मागें हटले कधीं ? ।
विकुन या, न्या बाजारामधीं ।
अशी कंचि ऐकेल दुसरी स्त्री लोकाची हो मी (?) ॥२॥
कोण अतां दुसरा ? ईश्वराठाइ तुम्हा मोजितें ।
जेवितां तुम्ही मग जेवितें ।
उणे शब्द लोकांचें बोलणें मुकाटयानें सोशिते ।
फार तुमच्या रागाला भिते ।
विचारल्या विरहीत काय मी करिते आपल्या मतें ? ।
पाजितां तितुकें पाणी पिते ।
जे तुम्हांस तें मला, सदा तुमच्याच विचारांत मी ॥३॥
दान प्रीतीचे, म्हणुन पद किती आदरानें धरूं ? ।
करा प्रतिपाळ जसें लेकरूं ।
मूळ प्रीतीचे तुम्ही निर्वाहक, कशी तुमचेविण तरूं ? ।
जसें वनवासामधें पाखरूं ।
कसें राहवतें ? आतां उभयतां न ये कंटाळा करूं ।
याच मार्गानें शेवट करूं ।
होनाजी बाळा म्हणे, आराधुन मूळ पुरुषाला नमी ।
देव तुजकडे, नको होउं श्रमी ॥४॥