Get it on Google Play
Download on the App Store

पुस्तक पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार:


प्रस्तावना:

पुन्हा नव्याने सुरुवात  

 

आज मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे. काही दिवसांपूर्वी मला ‘‘पुन्हा नव्याने सुरूवात’’ ही कादंबरी वाचावयास मिळाली. या अगोदर अग्नीपुत्र पुस्तकासाठी जवळपास 5 लाख वाचकांचा प्रतिसाद मिळालेले प्रसिद्ध लेखक श्री. अभिषेक ज्ञानेश्‍वर ठमके यांची ही अत्यंत उत्कंठावर्धक कादंबरी आहे. मी पुन्हा नव्याने सुरुवात ही कादंबरी वाचायला सुरूवात केली अतिशय रंजक आणि चित्तथरारक अशी कादंबरी वाचत असताना, मी त्या कादंबरीचाच एक घटक आहे की काय असे मला वाटू लागले.

 

एक - एक पान मी वाचत होतो त्यामध्येच मी रमून गेलो. कादंबरी मी एका बैठकितच संपविली परंतु कादंबरीचे लेखक अभिषेक ठमके यांची शब्द रचना, शब्द शैली मनाला भाऊन गेली अनेक नवनवीन विचारचक्र माझ्या डोक्यात सुरू झाले आणि खूप काही प्रत्यक्ष अनुभवल्याचा आनंद मिळला.

 

कादंबरीचे लेखक अभिषेक ज्ञानेश्वर ठमके यांनी महासागरामध्ये कार्यरत असलेले अनेक सैनिकांचा प्रत्यक्ष अनुभवच प्रत्येकाचा वाचावयास मिळेल. आपण सामान्य व्यक्ती अगदी निवांत, शांत, आणि स्थिर प्रकारचे आयुष्य जगत असतो. परंतु आपली काळजी घेणारे आणि दिवस-रात्र कार्यरत असणारे सैनिक त्यांची काय अवस्था असते याचा आगळा वेगळा अनुभव लेखकाने पुन्हा नव्याने सुरूवात या कादंबरीमध्ये सादर केला आहे. मानवाच्या प्रत्येक जडण घडणीमध्ये अनेकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य असते. परंतु हे मान्य करून जो व्यक्ती सतत इतरांच्यासाठी कार्यरत असतो तोच खर्‍या अर्थाने जीवनामध्ये यशस्वी होत असतो. कोणत्याही कठिण प्रसंगी स्वतःवर आत्मविश्‍वास असणे खूप आवश्यक असते.

 

ही कादंबरी वाचत असताना मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्या शब्दांमध्ये व्यक्त करणे खरोखरच खूप कठिण आहे. आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीमध्ये हरलो, तरी ती भावना जितकी दुर्देवी आणि दुःखदायक असते. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणे, ही भावना जास्त भयंकर असते. सतत प्रयत्न करत राहीले तर यश नक्कीच मिळेल हे देखील सत्य आहे.

 

पुन्हा नव्याने सुरूवात ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे लेखकाची लेखन शैली जिचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, आणि दोन म्हणजे आपण स्वतः घरामध्ये बसून महासागरामध्ये वावरण्याचा अनुभव त्याच बरोबर तेथील हालचाली आणि त्यांच्यावर योजीले जाणारे उपाय त्यांचे नियोजन करता येईल हे समजू शकते. कादंबरीचे लेखक अभिषेक ज्ञानेश्‍वर ठमके तसेच कवितासागर प्रकाशनचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

 

- मंगेश विठ्ठल कोळी

+ 91 9028713820, mangeshvkoli@gmail.com