Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १८

विज्ञानाने नमूद केले आहे की, पृथ्वीवरील सजीवांच्या किमान ९९ टक्के जाती आजतागायतच्या करोडो वर्षांच्या इतिहासात नष्ट झाल्या आहेत. पृथ्वीवरील जीवनाची सुरूवात फार-फार प्राचीन काळी म्हणजे सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून ते आजतागायत सजीवांच्या असंख्य जाती जन्माला आल्या व नष्टही झाल्या. पृथ्वीवरील जीवन सर्वात प्रथम पाण्यात, महासागरात निर्माण झाले असे सांगण्यात येते. शार्कसारखे मासे फार प्राचीन आहेत.

 

सर्वसाधारणपणे आपण असे मानतो की, हे विश्व व ही सजीव सृष्टी आकाशातल्या देवाने निर्माण केली. पण, विज्ञान मात्र असे सांगत नाही. विज्ञान म्हणते की, सर्वात प्रथम सजीवाचा जन्म समुद्रात काही अजैविक अर्थात मृत घटकांमधल्या रासायनिक प्रक्रियेतून झाला असावा. पृथ्वीचा जन्म साधारणतः ४५० ते ५०० कोटी वर्षांपूर्वी झाला. पण ती विविध स्थित्यंतरातून जाऊन सजीवांच्या विकासाची सुरूवात होण्यास मात्र आणखी सुमारे १५० ते २०० कोटी वर्षे इतका प्रचंड काळ जावा लागला. सजीवांचा विकास होण्यास ३०० कोटी वर्षे जावी लागली. यावरूनच असे म्हणता येईल की, देव वगैरे शक्तींनी सजीव निर्माण केले नसावेत.

 

सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील वातावरण सजीवांच्या विकासासाठी पोषक बनले. ढगांची निर्मिती झाली. पाऊस पडू लागला. पृथ्वीवरील वातावरण दमट, उष्ण होते. सतत पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग तयार होत व परत जोरदार पाऊस पडे. पृथ्वीवर प्रचंड विजा व गडगडाट होत असे. असे प्रदीर्घ काळापर्यंत होत राहिले. अशा प्रकारे सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी जीव निर्माण होण्यास सुरूवात झाली. पाण्यात एकपेशीय जीव व जमिनीवर वनस्पती उगवण्यास सुरूवात झाली. सजीवांचा सर्वात जुना अवशेष सापडला तो ३२० कोटी वर्षांपूर्वीचा आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या विकासाचा क्रम अत्यंत रंजक आहे. सजीवांच्या निर्मितीचा हा इतिहास फारच थोड्यांना माहिती असेल. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने ज्ञात झालेल्या सजीवांच्या निर्मितीचा क्रम आणि इतिहास पहायला गेलं तर, पृथ्वीचा जन्म सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर जीवांची उत्पत्ती होण्यास अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आणखी दिडशे ते दोनशे कोटी वर्षे इतका महाप्रचंड कालावधी लागला. पण जीवांची निर्मिती गती घेण्यासही खूपच मोठा काळ गेला. २०० कोटी वर्षांपासून ते १०० कोटी वर्षांपर्यंत म्हणजे सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर भयंकर पाऊस पडत राहिला. याचवेळी सागर, महासागर, नद्या व इतर जलाशय तयार झाले असावेत. एवढ्या प्रदीर्घ काळात जीवन सुक्ष्म जंतूंपर्यंतच मर्यादित राहिले. पाण्यात बहुतेक केवळ अदृष्य जीवजंतूच तयार होत गेले. कारण, अजूनही पृथ्वीचे वातावरण जीवन तयार होण्यास पूर्णपणे अनुकूल नसावे.

 

१०० कोटी वर्षांपासून समुद्रात काही प्राथमिक प्राणी व वनस्पती बनण्यास सुरूवात झाली. सुमारे ५० कोटी वर्षांपासून प्राथमिक स्वरूपातले मासे तयार होण्यास सुरूवात झाली. या काळी समुद्रात मोठ्या प्रमाणात सजीव निर्मिती चालू झाली. सुमारे ६४ कोटी वर्षांपूर्वी जमिनींवर झुडूपांच्या स्वरूपात तर सुमारे ४० कोटी वर्षांपासून पाण्यात माशांव्यतिरीक्त अन्य प्रकारचे प्राणीही तयार होऊ लागले. पृथ्वीवर वृक्ष निर्माण होण्यासही याच काळात सुरूवात झाली. सुमारे ३२ कोटी वर्षांपूर्वी पाणथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात घनदाट जंगले तयार होऊ लागली. तसेच पंख असणारे किटक तयार होऊन ते उडूही लागले. सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वी साप व तत्सम सरपटणा-या प्राण्यांचा विकास झाला. सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी डायनोसोर या महाकाय प्राण्याचा जन्म झाला. या प्राण्याचे पृथ्वीवर दीर्घकाळ अस्तित्व होते. डायनोसोर सुमारे १८ कोटी वर्षांइतका प्रचंड काळ पृथ्वीवर वावरत होते. पण या काळात मानव मात्र नव्हता. मानवाच्या वंशाची सुरूवातही झाली नव्हती. अनेक प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी डायनोसोर तयार झाले. सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सर्व डायनोसोर नष्ट झाले. ते कशामुळे नष्ट झाले ते मात्र सांगता येत नाही. याबाबत अनेक गृहितके मांडता येतात. पण यातले एकही या महाकाय प्राण्याच्या अस्ताचे नेमके कारण देऊ शकत नाही.

 

याच काळात काही सस्तन म्हणजे पिलांना जन्म देणा-या प्राण्यांचाही उदय झाला. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी डायनोसोर त्यांच्या उत्कर्षाच्या शिखरावर होते. याच काळात उडणारे प्राणीसुद्धा अस्तित्वात होते. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी फुले लागणारी झाडे अर्थात् फुलझाडे तयार झाली. सध्या दिसणारे आधुनिक मासे तयार झाले. सुमारे ६ कोटी वर्षांपूर्वी चांगले विकसित असे सस्तन प्राणी तयार झाले. घोड्याचा प्राथमिक वंशज याच दरम्यान तयार झाला. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे याच काळात पृथ्वीवरील सुमारे १८ कोटी वर्षे नांदणारी डायनोसोरची जात नष्ट झाली. सस्तन प्राणी मोठ्या प्रमाणात तयार झाले. इतर प्राणी विकसित होत असताना डायनोसोर का नष्ट झाले? ही चकित करणारी गोष्ट आहे. कदाचित एखाद्या साथीच्या रोगाने मेले असतील.

 

सुमारे साडेतीन कोटी वर्षांपूर्वी मानवाचे प्रारंभिक वंशज तयार झाले. शाकाहारी सस्तन प्राणी तयार झाले. दोन कोटी वर्षांपूर्वी म्हणजे अगदी अलिकडेच हिमालय पर्वत निर्माण झाला. हिमालयाची निर्मिती अजूनही पूर्ण झालेली नाही. अद्यापही त्यावरच्या घडामोडी चालूच आहेत. याच काळात वाघ निर्माण झाले.

 

सजीवांच्या निर्मितीच्या या क्रमात मानवाची निर्मिती मात्र, फारच उशीरा व सर्वात शेवटी झाली. पृथ्वीवर निर्माण झालेला मानव हाच सर्वात शेवटचा सजीव असावा. मानवाच्या निर्मितीची सुरूवात केवळ ६० लाख वर्षांपूर्वीच झाली. आणि ती प्रक्रिया पुढे सुमारे ४० लाख वर्षे सुरूच होती. वीस लाख वर्षांपूर्वी आदीमानव निर्माण झाले. मानव फार तर दहा लाख वर्षांपूर्वीच म्हणजे अगदी अलिकडेच तयार झाला. आधुनिक मानव सुमारे एक लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. तो बोलत असावा तसेच शिकार करून मांस भाजून खात असावा असा अंदाज आहे. या मानवाचे सापळे वा अवशेष जगात सर्वत्र सापडलेले आहेत. हे मानव गुहेत रहात. ते शिकारीसाठी दगडी हत्यारांचा उपयोग करीत.

 

अगदी आधुनिक मानव केवळ ४५ हजार वर्षांपासूनच अस्तित्वात आहे. तो बोलत असावा. केवळ १० हजार वर्षांपासून शेती करणा-या मानवी संस्कृतीचा उदय झाला. याच काळात मानव वस्ती करून व शेती करून राहू लागला. खरी मानवी संस्कृती केवळ ६ हजार वर्षांपासून सुरू झाली, ते आजतागायत सुरू आहे. अशा प्रकारे पृथ्वीचे वय व सजीवांच्या विकासाचा कालावधी लक्षात घेता मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व अगदी हल्लीचे आहे. एवढ्या कमी कालावधीत त्याने पृथ्वीवर जीवन-मरणाची स्थिती निर्माण केली आहे. सर्व प्राणी नष्ट केले. जंगले उध्वस्त केली. प्रदुषण निर्माण करणारे सारे शोध लावले आणिग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे केले. शिवाय विविध रोगांनी जी लक्षावधी माणसे मरताहेत ते तर वेगळेच!

 

अशाप्रकारे फार मोठा काळ खर्च करून पृथ्वीवरचे जीवन तयार झाले. त्यासाठी तीनशे कोटी वर्षांचा फार मोठा कालावधी गेला. ही सारी उत्क्रांतीची अवस्था होती. कोणत्याही देवाच्या कृपेने एका रात्रीत वा दिवसात पृथ्वी वा मानव निर्माण झालेला नाही. डायनोसोर या पृथ्वीवर सुमारे अठरा कोटी वर्षे वावरले, मासे तर पन्नास कोटी वर्षांपासून आहेत. या तुलनेत मानवाची एक लाख वर्षे तशी फारच कमी म्हणायची. अत्याधुनिक हत्यारे, क्षेपणास्त्रे व अणुबॉंब बाळगून असणारी मानवजात स्व्तःच्या हाताने केव्हा स्वतःच्याच पायावर धोंडा मारून स्वतःचेच अस्तित्व संपवेल ते सांगता येणार नाही. कोणत्याही कारणाने का होईना, एकदा का पृथ्वीवरील जीवन नष्ट झाले की, संपूर्ण विश्वात कुठेही जीवन अस्तित्वात राहणार नाही. पृथ्वीवरील जीवनाची निर्मिती अगदी योगायोगाने व एका विशिष्ट परिस्थितीतच झाली आहे. परत तशी परिस्थिती यापुढे संभवणे फारच कठिण बाब आहे.

 

ब्रुसचे डोळे पाणावतात. आता आलेली परिस्थिती त्याला असह्य होते. चुक आपण करायची आणि त्याची शिक्षा या पृथ्वीने, संपूर्ण सृष्टीने भोगायची. आता हा विचार करुन काय उपयोग? आता तर सगळंच संपलं होतं. जेवढी माणसं उरली होती त्यांचा शोध घ्यायचा तेवढा बाकी होता. ऋतु क्षणाक्षणात बदलत होते. कधी खूप ऊन तर कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी तर कधी श्वास घेता येत नसे. डोळ्यासमोर मृत्यू असूनदेखील एक आशा त्या सर्वांना जिवंत ठेवत होती. ती म्हणजे, आमचे सर्व जिवलग सुखरुप आणि जिवंत असतील. एक एक दिवस असाच पुढे जात असतो. प्रत्येकाचे डोळे चातकासारखे रडार आणि समुद्राच्या क्षितीजांवर नजर ठेवून होते. कधी एकदा जहाज दिसतं आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटतो असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या नादातच त्या सर्वांना तहान-भुकेची काही चिंता नसते. आणि एके दिवशी असंच मोहम्मदला रडारवर जहाज दिसू लागतं. जरा बारकाईने पाहिल्यावर त्याला ते स्पष्ट दिसतं. जहाज पुर्व दक्षिण दिशेला होतं. रडारवर जहाज पाहून तो इतका खुश होतो की तो लगेच मोठ्याने ओरडतो,

 

‘‘सर, पूर्व दक्षिण दिशेला एक जहाज दिसत आहे...’’

 

जहाजामध्ये दाढी वाढलेला अभिजीत आपल्या खुर्चीवरुन ताड्कन उठतो आणि त्याच्या रडार यंत्राजवळ येऊन खात्री करुन घेतो. त्यांच्यापासून साधारणपणे 450 कि.मी. दूरवरुन एक जहाज त्यांना येताना दिसतं.

 

पाणबुडी लगेच त्या दिशेने आपला प्रवास सुरु करते.