Get it on Google Play
Download on the App Store

रसायन

मेघना वहिनी हे आमचं एक अजब रसायन आहे. स्केटींग मधे पटायीत असलेल्या आमच्या या वहिनीला सप्तपदीसुद्धा म्हणे स्केटींग करत घालायच्या होत्या..
मावशीची ना नव्हती पण आमचा दादाच या कल्पनेने हबकला होता..पण समंजस मेघना वहिनी अगदी पारंपारीक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली , सामावली...पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही
सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असयाचच
त्यामुळे बरेचदा संवाद खंडीत व्हायचा.. काहीही सांगितलं तरी मधेच अडवत ती म्हणणारच हे तर काहीच नाही आमच्या वाड्यात ना याहून....तरी वहिनीचं वागणं कुणाला खटकायचं नाही कारण एरव्ही तिचं वागणं अगदी सालस आणि समजुतदार होतं
तिचं माहेरही होतच तसं तालेवार त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ती केवळ माणसं बघूनच त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी अगाऊपणा झाला नाही की अवमान झाला नाही
वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची त्यात एकदा ्दादा तिला आणायला जायचा...हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं ती माहेराहून आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे.. अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे त्यांचा भलामोठा वाडा त्यांची लांबचलांब पसरलेली बाग फुलांचा ढीग बागेशी येणारे मोर वाट चुकून आलेली हरणं सगळच स्वप्नवत वाटावं असं म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी ही मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी? याचं आष्चर्य वाटतं
मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचच कारण तो परिसर ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती
मी दहावीत नापास झालो तेंव्हा आईचं काही नं ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती
म्हणाली आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडाऊन सोडतील...
चित्रपटात कसं पाहुणे आले की " ती घरची बाई नोकराला सांगते इन्हे इनका कमरा दिखाओ.. किंवा जवळचा कोणी असेल तर आओ मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ.असं म्हणून द्रुष्यातून एक्झीट घेते.. पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं..
वहिनीचं माहेरही तसच चौसोपी होतं त्यात वहिनी माहेरची मोठी लेक त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती.. मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली,मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती माझी दहावी नापास होणं एका अर्थी सेलिब्रेट केलं जात होतं..
म्हणजे एकूण काय अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं.. मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाहीपण तरी आमच्या परीने त्याने आस्मान को हाथ छू लिये...
पण एक जाणवायला लागलं वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता
मधे तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून अलिशान बंगला बांधला गेला दोन्ही भावांची आँफीसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती... वास्तूशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते मलाही बोलावलं होतं पण जायला जमलं नाही
पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली...
शेवटी नं राहवून मी वहिनीला विचारलच म्हंटलं हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस
ती खिन्नपणे म्हणाली काय बोलू?
काय झालं? मी विचारलं
ती म्हणाली तसं पाहिलं तर काहीच झालं नाही.. सगळं रीतीला धरून झालं
पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतो
क्षणभर गप्प राहून ती म्हणाली आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो आपण आता त्या घराला परके झालो हे आमच्या लक्षातच येत नाही...आणि माहेरचे लेक परकी झाली हे गृहीतच धरून चलतात... खूप यातनामय आहे हे
वहिनी नीट सांग मी काकुळतीला येत म्हणालो..
तशी ती म्हणाली काही नाही रेsssss आधी वाडा होता त्यात माझी स्वत:ची खोली होती मला माझ्या खोलीचं कौतूक होतं घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे
मग आता? मी नं राहवून विचारलं
आता इतका अलिशान बंगला बांधला एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही
म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय तरी त्याची रूम आहे आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे दादाच्या दोन्ही मुलाना वेगवेगळ्या रूम्स 
पण ताईची जागा या घरात अबाधीत आहे असंकोणालाच वाटलं नाही..
मी सहज विचारून गेले माझी रूम? तर शंतनू म्हणाला गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच
 अगदी गेस्टरूमला जरी तो म्हणाला असता ती तुझी खोली तरी मी सुखावले असते , मी थोडीच त्या खोलीवर हक्क सांगणार होते? की बारा महिने मुक्काम ठोकणार होते?
जागा होती पण सामाऊन घेणं जे म्हणतात ते त्यांच्या  लक्षातही आलं नाही
त्यात ते काही वेगळं वागले नाहीत इथली रीतच अशी..
मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले.. पण ही रीत मी मोडेन आपण जेंव्हा बंगला बांधू मी छकुलीचं लग्न झालं तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन... गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे... आपल्या लेकीबाळी नाही त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी...त्या आपल्याच असतात 
वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...
By: Chandrasekhar Gokhale

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम