Get it on Google Play
Download on the App Store

निरोप..

[6:27 PM, 10/11/2017] +91 99161 46056: असा स्वातंत्र्यवीर पुन्हा होणे नाही...

तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे , जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे , जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं...

सावरकरांनी एकच सांगितलं ,

" माई , काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं , त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार... कावळे , चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्या पुरता संसार कोणालाही करता येतो , ' आम्हांला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना '. 
आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच , वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं , असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात , मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं ; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का ?! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार...

माई , कल्पना करा... की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. आपल्या घराला आग लावली , तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा , म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला !!! वाईट वाटून घेऊ नका , एकाच जन्मात मी तुम्हाला एतका त्रास दिला की हाच पती जन्मोंजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं.
पुन्हा ह्या जन्मी शक्य झालं तर भेटू , नाहीतर इथेच निरोप..."

असं म्हटल्यानंतर ती सव्वीस वर्षांची - पंचवीस वर्षांची पोरगी अशी पटकन खाली बसत त्या तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते सावरकरांच्या पायाला हात लावते. ती धूळ आपल्या मस्तकी लावते , सावरकरांनी एकच विचारलं माई काय करता... त्या पंचवीस वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं , "हे पाय बघून ठेवते पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले , पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला , मला नाही वाईट वाटत त्याच... मला नाही वाईट वाटत. तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे , माझ्या तपश़्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणिन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा , आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू..."

काय ताकद आहे हो... निरोप देण्यात काय ताकद आहे...

असा स्वातंत्र्यवीर कदापि पुन्हा होणे नाही ... मानाचा मुजरा ...!!!
[6:39 PM, 10/11/2017] +91 99161 46056: राज राहणार मुंबई. वय वर्ष २८. उंच देखणा गोरागोमटा. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय. राज खुपच स्वाभिमानी त्याची दहावीची परीक्षा झाली आणि त्याने पेपर लाइन टाकायला सुरुवात केली. गेली कित्येक वर्ष राज न चुकता आमच्या चाळीत पेपर टाकायला येत असे. आज तो ग्रॅजुएट होऊन मोठ्या कंपनीत एमआर झाला होता. पगारही खूप चांगला होता तरीही न चुकता पेपर टाकायला यायचा अजूनही. नंतर कळलं समोरच्या घरातील प्रिया वर भाळले होते महाशय. तीपण त्याचा प्रेमात आकंठ बुडालेली. पेपर च्या सोबत प्रेमपत्र देऊन प्रियाला त्याने प्रपोजसुद्धा केल होत. तिनेसुद्धा दुसर्याा दिवशी त्याचा हातात चिठ्ठी देऊन होकार कळवला होता. उच्चशिक्षीत असूनही फक्त वडील बुरसटलेल्या विचाराचे असल्याकारणाने तिला घरून बाहेर पडण्याची सोय नव्हती, साधा मोबाईलाही घेऊन दिला नव्हता त्या पोरीला. त्यामुळेच फक्त प्रियला भेटता याव म्हणून राज आजही आमच्या चाळीत पेपर टाकायला येत होता. ती रोज सकाळी उठून त्याचाकडून स्वत: पेपर घेत असे. पेपर घेताना होणारी दोन-चार शब्दांची देवघेव, नजरेतून ओसंडून वाहणार प्रेम, पेपर हातात घेताना होणारा प्रेमळ स्पर्श दोघांनाही सुखाऊन जात असे. त्याचा घरी त्याने सांगितलं कुठेच ना नव्हती राजच्या दिलखुलास बापाने सांगितलं ‘नाही तयार झाले तर पळवून आण पोरीला’ त्याला धीर मिळाला. पण तीच तस नव्हतं मुलगा आपल्या जातीचा नाही हे कळताच तिच्या बापाने आकांडतांडव केला. मीपण एक त्यांचा घरचा सल्लागार म्हणून तिथे उपस्थित होतो. मी दोघांची खूप बाजू मांडली पण तिचा बाप काही एकूनच घेईना. साध मुलाचं नाव काम न विचारता सरळ पहिला जात विचारून मोकळा झाला. प्रियाच घराबाहेर पडण पूर्णत: बंद केल गेल आणि लगेच त्याचदिवशी तिच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू झाले. मीच राजला सगळी हकीकत सांगितली आणि चाळीत येऊ नको असा सल्ला दिला. प्रियाचा भाऊ प्रशांत मात्र दाखवत नसला तरी प्रियाच्या बाजूने होता. तो माझ्याकडे आला राजची नीट चौकशी केली आणि शेवटी मला म्हणाला प्रियाला मदत केली पाहिजे. दोन क्षणासाठी त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. मी आधीपासूनच प्रिया आणि राजच्या बाजूने असल्याचे त्यादिवशीच्या रामायणामुळे त्याला कळले होते. प्रशांत तळमळीने बोलला राजला सांगा प्रियाला पळवून न्यायला. राजला मी आणि प्रशांतने भेटून हे सर्व सांगितले. राजजवळ दूसरा पर्याय नव्हता. दिवस ठरला वेळ-ठिकाण ठरल. राजच्या घरचे सर्वजण कोर्टात उपस्थित होते. इथे प्रियाच्या हृदयात धडधड वाढली. सकाळीच तिने बर वाटत नाही अस नाटक करून स्टेशनजवळच्या डॉक्टर कडे जाते अस सांगून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी पेपर वाचता वाचता चश्मा खाली करून संशयी नजरेने तिच्याकडे पाहिल्याचे प्रशांतने हेरले आणि तो पटकन म्हणाला चल मी ऑफिसला चाललोय बाइकने सोडतो तस घरी सगळं अलबेल झालं. डॉक्टरकडून थेट घरी ये ही धमकीवजा सूचना घेऊन दोघे निघाले. मी आधीच कोर्टात पोहचलेलो. साधारण तासाभरात प्रशांत प्रियाला घेऊन कोर्टात आला. कायदेशीररीत्या राज प्रियाच लग्न झालं. प्रशांताने विटनेस म्हणून सही केली आणि त्याचा मोबाइल खणाणला “प्रिया अजून घरी आली नाही डॉक्टरकडे पण नाही” प्रियाचा बाप जवळजवळ ओरडलाच. प्रशांत म्हणाला मी लगेच घरी येतो. घरी येऊन थोडी शोधाशोध करायचं नाटक करून त्याने प्रियाने आधीच लिहून ठेवलेली चिठ्ठी वाचून दाखवली. घरच्यांनी प्रियाशी संबंधच तोडून टाकले. प्रिया सुखात होती. ‘पोरीला जरासुद्धा त्रास झाला तर याद राखा’ असा दमच राजच्या बापाने घरातील सर्वांना दिला विशेषत: स्वत:च्या फटकळ बायकोला. सात महिन्यानंतर.... राज नेहमीप्रमाणे बाईक वरुन कामाला निघाला आणि रस्त्यातील अपघात बघून थांबला. बघतो तर काय बघ्यांच्या गर्दीत प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. तो लगेच त्याला घेऊन हॉस्पिटलला पोहचला. पोलिसांनी प्रशांताच्या पाकीटातील डायरीतील नंबर घेऊन त्याचा घरी कळवले. लगेच त्याचा बापा-आई आणि मी  हॉस्पिटलला पोहचले. मी राजला बघून आस दाखवलेच नाही की मी त्याला ओळखतो फक्त नजरेने त्याला धन्यवाद दिले तिलाही ते कळले. डॉक्टर बाहेर आले तसे प्रशांतच्या बापाला म्हणाले अजून अर्धा तास उशीर झाला असता तर तुमचा मुलगा या जगात नसता. नशीब तुमचं चांगलं की तो तरुण याला इथे वेळेत घेऊन आला. डॉक्टरांनी राजकडे बोट दाखवत म्हटल. रक्तात माखलेल्या सफेद शर्टातला राज मात्र यावेळी प्रियला सगळं सांगून तिला समजवत होता की तू इथे येऊ नको प्रशांत सुखरूप आहे. प्रशांतचा बाप येऊन राजला धन्यवाद करू लागला त्याचे पाय धरू लागला. या म्हातारपणात एकुलता एक मुलगा राजमुळे वाचला होता या उपकरांच्या दडपणात प्रशांतचा बाप एव्हाना दाबून गेला होता. दुसर्याए दिवशी प्रशांतला शुद्ध आली तेव्हा त्याचा बापाने त्याला सगळं सांगितल. प्रशांतने त्या देवदूताविषयी चौकशी केली तेव्हा त्याचा बापाने राजने दिलेल विजिटिंगकार्ड प्रशांतला दिल. प्रशांतच्या डोळ्यात पाणी तरळले. जेव्हा राजबद्दल प्रशांतच्या बापाला कळलं त्याला मेल्याहून मेल्यासारख झालं. दोन आठवड्यांनी रविवारच्यादिवशी सकाळी प्रशांतसह त्याचे आई-बाप राजच्या घरी पोहचले. दरवाजा प्रियानेच उघडला तिच्यासाठी हा सुखद धक्काच होता. प्रशांतच्या बापाने सर्वांची मनापासून माफी मागितली खास करून प्रिया आणि राजची. पोराचे जीव वाचविलेल्या उपकाराने जातीपातीच्या भ्रमाचा बुरखा एव्हाना फाटला होता. आज राज आणि प्रियाला तीन वर्षाचा मुलगा आहे सर्वजण सुखात आयुष्य जगतायत.


- सिद्धेश कोरगांवकर

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम