लक्ष्मी
माहेरचे संस्कारांचे वैभव घेऊन घरात प्रवेश करते
वैभवलक्ष्मी
आल्यागेल्याचा मानपान ठेऊन घर भरले ठेवते
ऐश्वर्यलक्ष्मी
ओठातून पोटात शिरायचे कसब जाणते अन्नपूर्णा होऊन
धान्यलक्ष्मी
वंशवाढी साठी बाळाला
नऊ महिने उदरी वाढवते
संतानलक्ष्मी
पैसा पैसा कष्टाने साठवून
त्याचा योग्य विनियोग करते
धनलक्ष्मी
घराबाहेर पडून संसाराला
आपल्या परीने हातभार लावते
वीरलक्ष्मी
वंशाच्या दिव्यासह वंशाच्या पणती ला ही सन्मानाने वाढवते
आधीलक्ष्मी
लेकरांना जगाचे ज्ञान देवून विजयपथावरआणते
विजयालक्ष्मी
सर्व आघाड्यांवर लढून
आपुल्या बलाचे दर्शन घडवते
गजलक्ष्मी
या सर्व लक्ष्मी रूपांनी
सजते आपुल्या घरी युगानुयुगे गृहलक्ष्मी
मंजू काणे