Get it on Google Play
Download on the App Store

कळीचा नारद

सदाशिवराव आणि माधवराव दोघांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस लागली होती .सदाशिवराव आणि माधवराव एकेकाळचे एकमेकांचे मित्र पण दोघांचीही जशी जशी प्रगती झाली तशी  त्यांच्यामध्ये इगो निर्माण झाला.व दुरावा आला .सदाशिवरावांचा स्वभाव तोंडावर पटकन बोलून दाखवणे व जे मनात आले ते बोलून दाखवणे राग आला तर लगेच व्यक्त करणे असा होता .त्यांच्या अशा स्वभावामुळे बरेच लोक त्यांना तापड स्वभावाचा मनायचे व बरेच जण दुरावले गेले होते .या उलट माधवरावांचा स्वभाव होता कधीही कुणाला काही मनायचा नाही, आपल्याला एखादी गोष्ट साध्य करून घ्यायचे असेल तर, तिसऱ्या माणसाला चुनकून देणे ,किंवा दुसऱ्याला भडकून देऊन आपलेे ईप्सित साध्य करायचे आहे ते साध्य करणे बैठकीमध्ये चारचौघांमध्ये काहीच न बोलता बैठक झाल्यावर आपल्याला जसे पाहिजे तसे त्या बैठकीचे विश्लेषण करणे व आपल्या  विरोधकांना बदनाम करून आपण कसे या सर्व गोष्टींपासून अलिप्त आहोत ,असे दाखवणे   माधवरावांचे एक वाक्य होते  , काट्याने काटा काढावा लागतो..........
 त्यासाठी हे सर्व करावं लागतं,......
 ग्रामपंचायतमध्ये सेवक द्यायचे ठरले होते त्या संदर्भात बैठक आयोजित केली होती, सदाशिवराव  व त्यांचे सहकारी अगोदरच पोहोचले होते, पण माधवराव  व त्यांचे सहकारी येत होते, एक जण मनाला बरं झाल्  ग्रामपंचायतला सेवक नव्हता सेवक मिळेल माधवराव हळूच म्हणाले सेवक मिळेल पण नाव सदाशिवरावांचे होईल मग त्यांचे नाव होऊ द्यायचे काय? त्यावर सर्वांनी एकमेकांकडे बघितले. बैठकीत सदाशिवरावांच्या ठरावाला सर्वांनी विरोध केला बैठकीत माधवराव काहीच बोलले नाहीत, एकदम  शांत, सोज्वळ, चेहरा करून बसले, सदाशिव रावांना वाटले सर्वजन विरोध करत आहेत पण माधवराव  विरोध करत नाहीत माधवराव किती चांगला माणूस आह....े पण ही सर्व आग माधवरावांनी लावली होती ,बैठक संपल्यावर सदाशीवरावांनी आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वाना शिव्या घातल्या व आगाऊच भांडण ओढवून घेतल..... सर्वजन जात होते माधवराव सदाशिव रावांना हळूच म्हणाले  ठराव पास व्हायला होता सेवकांचि  गरज होती, पण यानि  ठराव पास होऊ दिला नाही यांना काहीच समजत नाही, पण मी ठरावाच्या बाजूने मतदान केले असते, त्यावर सदाशिवराव म्हणाले ग्रामपंचायतीमध्ये आपण एकटेच  समजदार आहात असे म्हणून सर्वजण निघून गेले . ठराव रेंगाळला .अशा प्रकारे दिवसामागून दिवस लोटत होते, पण काम काही होत नव्हते, सदाशिवराव ठराव मांडत ..... इतर सदस्य त्यास विरोध करत माधवराव बैठकीत एकदम शांत ,सोज्वळ व मला काहीच माहिती नाही असा चेहरा करून बसत . सदाशिवराव व इतर सदस्यांमध्ये वाद विकोपाला जात होते, यांचे संबंध फार ताणले जात होते, दुश्मनी वाढत होती माधवराव हळूच सर्व पेटून देऊन कान फुंकून बाजूला होत असत व सदाशिवराव व इतर सदस्य भांडून घेत असत . सदाशिव रावांना हे काय होत आहे समजत नव्हते सदाशिवराव ना वाटायचे माधवराव किती चांगला माणूस आहे जो आपल्याला विरोध करत नाही . पन सदस्यांना विरोध करण्यासाठी पेटविण्याचे काम माधवराव करत असे  ही नीती कुणाच्याही लक्षात येत नसे . इतर सदस्यांना वाटायचे माधवराव किती हुशार माणूस आहे जो आपणास मार्गदर्शन करतो म्हणजे माधवराव सर्व काही करून काहीच न केल्या सारखा राहात असे  .......
 गाव विकास समितीच्या अध्यक्षाचा कार्यकाळ संपला होता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक लावली होती, बैठक सुरू झाल्यावर सदाशिवरावांनि भगवान रावांचं नाव सुचवलं  त्यांच्या नावास इतर सदस्यांनी विरोध केला व  ठराव पास होऊ दिला नाही म्हणाले हा तुमचा माणूस आहे ग्रामपंचायत सदस्यांनी एक नाव सुचवले त्यास सदाशिवरावांनिे आक्षेप घेतला व सांगितले की हा तुमचा माणूस आहे त्यास मी अध्यक्ष होऊ देणार नाही बैठक लांबली होती ,सर्वांनी ब्रेक घेतला, ब्रेकदरम्यान माधवरावाने हळूच एका सदस्याचा कानात सांगितले की इतर सदस्य मनत आहेत की माधवराव तुम्ही अध्यक्ष हा ....  पण असे कोणत्याही सदस्यांनी माधवरावांना म्हटले नव्हते त्यावर ऐकणारा सदस्य मनाला "काही हरकत नाही माधवराव तुम्ही अध्यक्ष व्हा तुमचे तर कुणासोबतही वाद नाही .आपण एकदम शांत सोज्वळ प्रामाणिक आहात" बैठक सुरू झाली एका सदस्याने माधवरावांचे नाव सुचवले सर्व सदस्यांनी होकार दिला . सदाशिवराव सुद्धा म्हणाले  "काहीच हरकत नाही .....माधवराव एकदम चांगले आहेत त्यांचा कोणासोबतही वाद नाही ते माझे जिवलग मित्र आहेत ".असे म्हणून अध्यक्षपदाची माळ माधवरावांच्या गळ्यात पडली. पण सर्व सदस्यांतील अंतर्गत वाद भांडणे माधवरावांनी लावली होती हे कुणाच्याही लक्षात येत नव्हते .
 दिवसामागून दिवस जात होत. आपल्या या चुनकून द्यायच्या कौशल्याने माधवराव आज गावामध्ये प्रतिष्ठित नागरिकांच्या सर्वात वरच्या रांगेत जाऊन बसले होते .एखादा व्यक्ती कोणतेही कार्य करत असेल तर त्याच्या मागे एखाद्या त्रयस्थाचे डोके भडकून पाठीमागे लावणे व त्यास थंड करणे ,असा उद्योग माधवरावांचा चालू होता, ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपत आला होता .व हळूहळू सदाशिव रावाना माधवरावांची ही नीती लक्षात आली होती. ग्रामपंचायतचे इलेक्शन लागले होते सरपंच थेट जनतेतून निवडून द्यायचा होता. सदाशिवराव व माधवरावाने एकमेकांच्या विरोधात सरपंचपदासाठी फॉर्म भरला होता माधवरावांनी आपल्या कौशल्याने असे चित्र निर्माण केले होते की, मी स्वतः इलेक्शनला उभा राहिलो नाही तर लोकांनी मला उभे केले आहे....  सदाशिवरावांच्या कारभाराला जनता कंटाळली आहे .असे चित्र माधवरावांनी निर्माण केले होते व तसा प्रचार सुरू केला होता .माधवराव सदाशिव रावांना या काळात सुद्धा अधूनमधून फोन करायचे व वो मनाईचे सरपंच मि स्वताहून निवडणुकीला उभारायला नाही तर लोकांनी मला उभे केले आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावर राग धरू नका .सदाशिराव मनायचे मग फॉर्म उचलून घ्या ना ....त्यावर माधवराव म्हणायचे लोकांना कसा बेईमान होऊ..... असा धूर्त डाव माधवराव खेळत होते .सदाशिवरावांच्या काळात गावाची बरीच प्रगती झाली होती. सदाशिवराव भोळसर आणि तापट स्वभावाचे होते पण धुरत नव्हते .सदाशिवरावांच्या विरोधात सर्व जन्मत जात होते .आपल्या लबाडीने व धूर्तपणाने माधवराव लोक आपल्या बाजूने बोलवून घेत होते सर्व गावाला वाटायचे माधवराव म्हणजे शांत, सोज्वळ ,प्रामाणिक, कुणाच्याही भानगडीत न जाणारा माणूस असाच माणूस सरपंच झाला पाहिजे पण माधवरावांचा खरा चेहरा सदाशिवरावांच्या लक्षात आला होता. अफवा  तंत्राचा पुरेपूर वापर माधवराव करत होते ...... 
मतदानाचा दिवस दोन दिवसांवर आला होता, सदाशिव रावांना काय करावे हे सुचत नव्हते यावेळि आपण नक्की पडणार असे त्यांना वाटत होते . सदाशिवरावांच्या मुलगा नुकताच पुण्याहून शिकून आला होता आपल्या वडिलांची बेचेनि बघून त्यांना बोलला व सदाशिव रावांनी माधवरावांची सर्व हकीगत आपल्या मुलाला सांगितली व धूर्तपणाने व लबाडीने माधवरावांनी सर्व गावाला आपल्या विरोधात कसे उभे केले आहे ते सांगितले .मुलगा हुशार होता तो म्हणाला "बाबा या तंत्रास गोबेल्स नीती असे म्हणता यास अफवा तंत्र असेही म्हणतात. सर्व काही करायचे पण काहीच  केल्या नसल्या सारखे वागायचे  मुलगा म्हणाला "तुम्ही काळजी करू नका या तंत्राने त्यांनी तुम्हाला बदनाम केले आहे ना आपण सुद्धा याच तंत्राचा वापर करू या ".प्रत्यक्ष मतदानाचा दिवस सुरू झाला आणि काय आश्चर्य गावातील  सर्व लोक  जि सदाशिवरावांच्या विरोधात प्रचार करत होती ,ती सर्व सदाशिवरावांच्या घरी जमली .......  सदाशिव रावांना काय झाले ते समजत नव्हत,ं दुसरीकडे माधवराव आपल्या तंत्राप्रमाणे कार्यकर्त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करत होते .फोन करत होते पण त्यांच्याकडे कुणीही जायला तयार नव्हते ,मतदानाला सुरुवात झाली, चहा दारू मटण पैसे या सर्वांचा मनसोक्त आस्वाद मतदारांनी घेतला होता .दिवसभरात एकूण 91% टक्के मतदान झाले व प्रत्यक्ष निकालाचा दिवस उजाडला ,सर्वजन तहसीलसमोर जमा झाले व दुपारी दोन वाजता तहसीलदाराने  सदाशिव राव सरपंचपदी भरघोस मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले .सदाशिव रावांना तर विश्वासच बसेना ,माधवरावांना तर मशिनमध्ये फॉल्ट झाला की काय असे वाटू लागले सर्व गाव आपल्या मागे होते आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गाव अचानक कसा का सदाशिवराव कडे गेला असे माधवरावांना वाटू लागले. या प्रश्नाचे उत्तर केवळ सदाशिवरावांच्या मुलाजवळ  होते. रातरि सर्व सामसूम झाल्यावर सदाशिवराव  व त्यांचा मुलगा जेवण करत असताना सदाशिवरावांनि हाच प्रश्न आपल्या मुलाला विचारला. मुलगा मनाला" काही नाही बाबा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मि त्यांच्याच अफवा तंत्राचा म्हणजे गोबेल्स नीतीचा वापर केला, मी काय केले तर तालुक्याहून एक मर्सिडीज कार मागवुन घेतली व ती कार संध्याकाळी  दहा ते अकराच्या दरम्यान माधवरावांच्या वाड्यासमोर उभी केली, माधवराव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हटकल्यावर गाडीमध्ये बिघाड झालाय असे सांगितले कार एक तास तिथेच उभा करून एका तासाने   निघून गेली .मग आपल्या एका कार्यकर्त्याला गावातील कट्ट्यावर मी बसवलेले होते व तिथे दहा ते पंधरा जण चर्चा करत असताना आपल्या कार्यकर्त्याने अशी बातमी सोडलि की "माधवराव ज्या पक्षाकडून उभे आहेत त्या पक्षाने लोकांना देण्यासाठी किंवा वाटण्यासाठी म्हणून वीस लाख रुपये तालुक्याहून या कारमध्ये माधवराव कडे पाठवले आहेत  व ते वाटणार आहेत  व या विषयावर आपल्या कार्यकर्त्याने बरिच चर्चा करून तिथे बसून तो तिथून निघून गेला ही गोष्ट हळू हळू सर्व गावभर पसरली लोकांना वाटले, माधवराव आपल्याला पैसे वाटतील, लोक रात्रभर जागे होते लोकांना वाटू लागले आता पैसे वाटतील थोड्या वेळाने पैसे वाटतील   या आशेने रात्र जागून काढली. व सकाळी लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की  माधवरावाने वीस लाख रुपये घरांमध्ये दाबले .त्यांना काय मतदान करायचे आहे चला सदाशिव रावांना मतदान करु तो चांगला माणूस आह,े असे म्हणून लोक सकाळी आपल्या वाड्यांमध्ये जमा होऊ लागली व आपल्यास मतदान करून आपणास विजयी केले....
 सदाशिवराव म्हणाले "अरे पण ही लबाडी आहे ना " मुलगा म्हणाला " माधवराव हजार लबाडी करत येत पर्यंत पोहचला आहे आपण चांगल्या कामासाठी एकदाच लबाडी केली आहे.... बाबा तुम्ही जास्त विचार करू नका ..आपण फक्त जशाला तसे उत्तर दिलेले आहे". यावर बाबा पोट धरून हसू लागले व म्हणाले "बर  केलस एकदाची  कळीच्या नारदाची जिरवली" असे मनुन दोघेही हसू लागले  .....( काल्पनिक ) धन्यवाद 
(लेखक धनाजी वाघमारे व्यंगचित्रकार कंधार )

मराठी कथा नि गोष्टी

परम
Chapters
कुटुंब सोहोराब काका शाॅपींग फेस्टिव्हल... मामा गुरूमूर्ती यांचे नोटबंदीवरिल विचार अत्यंत सोप्या शब्दात शंभू तरुण रामस्वामी चोरकाका... #कुटुंब प्रोजेक्टचे व्हॅल्यूएशन सोबत रसायन साबून स्लो हैं क्या? "या सूरांनो चंद्र व्हा...." कोजागरी पौर्णिमा दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स... जादूगर ची बायको प्रेम प्रेम आणि विश्वास निरोगी राहण्याचे काही नियम लेखन संकष्टी महात्म्य समाधान श्रीमंतीचं दुसरं नावं मला वाटायच गोष्टी परीक्षण करतानाच्या (supervisionच्या) !! लेखन !! अखेर श्रीखंडाच्या वड्यांची रेसिपी सापडली गोष्टी परीक्षण करतानाच्या लक्ष्मी पंगिरा मधुमालतीचा वेल अप्रूप मसालेभात स्पर्श अखेरचा डाव.... आजी आईचा आत्मा जड झालेले आई-बाप दुर्दैवी मराठीची होरपळलेली पानं... निरोप.. हुरहुर दिवाळीची.... कळीचा नारद जन्याच पोर. ऍपल छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही.. आरोग्यम धनसंपदा श्रीमंत वृद्धाश्रम