हुरहुर दिवाळीची....
त्यादिवशी दुपारी गावाला चाललो होतो. मंडईपाशी छोटी 8ते 10 वर्षाची 2 मूल टिकल्या हाताने उडवत होते. फटफट अशा टिकल्यांच्या आवाजाने मन भुतकाळात गेल. लहानपणीची दिवाळी मनात पिंगा घालू लागली.
पंढरपुरी नवरात्रीचा उत्सव खूप मोठा असतो. देवळात पोषाख पाहायला जायचे. आंबाबाई लखुबाई पद्मावती यमाईला जायचे. सकाळी पापांच्या रुक्मिणी स्वयंवरला जायचो. त्यामुळे10 दिवस भुरकन् उडायचे. मग दिवाळीचे वेध लागायचे .सहामही परीक्षा असायची पण त्यावेळी आजच्या सारख आया अभ्यासासाठी खूप मागे लागायच्या नाहीत.