निराधार...
पायातला काटा
झाला वेदनेने गारं,
कुठे शोधू मी वाटा
जगतो आहे आज उधारं...
जीवनाचा अर्थ
कळलाच नाही नीट,
आडोशाला घराच्या
नव्हती कुठली विट...
सावलीत घड्याळाचा
हललाच नाही काटा,
उन्हांत आयुष्याच्या
गेल्या तापून वाटा...
दोन्ही डोळ्यांत जमला
आसवांचा थरं,
सांभाळू कसा आज
जगतो आहे मीच उधारं....
संजय सावळे