Get it on Google Play
Download on the App Store

गजरा...

ओल्या केसात तुझ्या
गजरा माळतांना,
तप्त उन्हांत भासतं
एक तृप्त काळं रान...

सळसळती काया तुझी
कात टाकलेली नागीण,
गौरवर्ण खुललेला
जणू सांजवेळची वाघीण....

सैरावैरा धावत होता
वारा तुझ बघून,
चुंबित होता अंग सारे
फिरे कधी बटामधून...

तप्त गोळा बघत होता
ढगांअडून लपून छपून,
ओल्या केसात तुझ्या
गारवा आला कुठून?

लावण्याची खाण जणू
जसं टिपूर चांदणं
भान हरवून बघत होतो
कोरलेलं जणू एक लेणं...

संजय सावळे