आपण आणि परिस्थिती...
माये तुझ्या पदराआड
सुखात किती होतो,
परिस्थिती आड तेव्हा
लपून मी पाहत होतो...
कुठं कळायची दुनियादारी
गरिबीत वाढत होतो,
अन मायबाबा मध्येच
जग सारं पाहत होतो....
सणासुदीला नटायला
मायला कुठं वेळ असतो,
परिस्थितीवर मात करण्याचा
तो एक बहाणा असतो...
आजही सांजवेळी
नकळत सारं आठवत असतो,
फाटक्या पदराडून
आभाळाशी बोलत असतो....
संजय सावळे