रम्य पहाट....
डोंगर माथ्यावरची मी
चालतो वळणाची वाट,
सभोवताली उंच झाडी
होते अरण्य घनदाट...
मधेच होते तळे रम्य
जणू अमृताचा माठ,
किलकील करीत पक्षी येति
उतरती त्यावरी थवे दाट...
हरवून गेलो दुःख सारी
उगवली नवीन पहाट,
चातकासम वेचित गेलो
आनंदाचे क्षण ते दाट....
कितीक भांडार भरू तरुचे
देऊ करुनि मोकळी वाट,
असेच वारे वाहता सुखाचे
भरून घेऊ आपले माठ...
संजय सावळे