Get it on Google Play
Download on the App Store

स्वप्नमहाली....

खेळतांना खेळ हा 
कुठला लपंडाव होता,
वेलीसारखी वेढतांना
आधार तुज माझा होता...

रेतीवरती स्वप्नमहाल
नजरेतून उतरला होता,
लाटेसारखी उनाड तू
क्षणात उध्वस्त केला होता....

चांदण्या मोजण्यात मग्न तू
अंधारात हरवलेला चंद्र होता,
तुला न कळला कधी
झाकलेला तो ढगात होता...

मावळत्याकडं बघून हल्ली
समझोता मनात होत होता,
जगण्यास थोडा उशीर झाला
जेव्हा काळोख दाट होता.....

संजय सावळे