कोर्ट आजही चालू आहे...
रोज न्यायालयात उभा असतो
जत्रेसारखी गर्दी पाहात,
प्रत्येक जण गुंग होता
जो तो आपल्या कामात...
शिशिरातल्या पानगळीगत
खटले रोज पडून असतात,
मंदिरातले पुजारी जणू
वकील किती दंग भासतात...
कपड्यांसोबत आब्रूची
लक्तरे टांगली जातात,
आपलीच इभ्रत आपलाच पैसा
वकील तेव्हढे पुढे असतात..
न्यायालयात हजर असते
पट्टी बांधून न्याय देवता,
खरा कोण खोटा कोण
वकिलच ठरवत असतात..
कित्येकांची आयुष्य
निकाला अभावी संपून जातात,
वर्षानुवर्षे कोर्टातली
खटले मात्र चालू राहतात...
संजय सावळे