नदी आणि आपण...
सोनेरी ताटवे उन्हाचे
झोपडीस माझ्या असावे,
अंगणात चिवचिवाट
रोज पाखरे जमावे.....
अंधाराचा सहवास
असावा मज सवे,
कोरा चंद्र झाकतांना
दाट चांदणे असावे....
नसेलही समुद्र किनारा
जवळ एक झाड असावे,
हवेच्या झुळके सरशी
पिकलेले पान गळावे....
आयुष्य झोपडीतून
आनंदात वाहावे,
वाहणाऱ्या नदीस शेवटी
अर्पून जावे....
संजय सावळे