झोपडी...
शेकोटीच्या आधाराला
रडत असतात कैक झोपड्या अन
अंधारात गोठलेल्या गारव्यात,
गोचिडागत चिकटून न्हाहळत असतात गरिबीचे हाल...
सूर्योदया बरोबर उगवतात
सुकलेली चेहरे अन
शोधीत असतात हाताला काम,
भूक मिटवण्यास पापी पोटाची
होतात गरिबीत हाल...
निरागस मुलांच्या हाती
असते कुठे पाटी अन पेंशील,
चिंताग्रस्त चेहऱ्यावर वाचत असतात पोटाचा इतिहास अन
पोटासाठी फिरणारा भूगोल...
संजय सावळे