खुणा...
हा ग्रंथ जीवनाचा
होता पुढ्यात माझ्या,
मी चाळतो पाने रोज
दुःखात भर माझ्या...
क्षणभंगुर क्षण काही
होते जीवनात माझ्या,
शाईसारख्याच खुणा काही
उमटल्यात काळजात माझ्या....
रोज उकलतो धडा नव्याने
दिसे न सुख स्वप्नी माझ्या,
दुमटलेली पाकळी फुलांची
होतो जपून काळजात माझ्या...
संजय सावळे