धुक्याची पहाट...
नजरेत तुला भरतांना
घन ओथंबून येतात,
किती लाजरे हे ऋतू
कूस क्षणात बदलतात...
मेंहदीच्या हातावरती
थेंबं टपोरी कोसळतात,
चिंब भिजूनी अंग
ओठ तुझे थरथरतात....
सळसळणारी झाडे उंच
वादळात किती डोलतात,
प्रीतीचा संदेश नवा
नभोनभी पेरतात...
चिवचिव करुनि पाखरे
मंजुळ गीत गातात,
हृदयाच्या पाऊलवाटा
धुक्यामध्ये हरवतात....
संजय सावळे