Get it on Google Play
Download on the App Store

पोकळी...

शाळेतली पुस्तके 
वाचून खूप झाली,
आयुष्याची धडे काही
शिकवून मज गेली...

सुख पेरिता न जाणले
दुःख उरी कैक दाटले,
मोकळे श्वास हवेचे
काळजास का भिनले?

आता न दिसे विठ्ठला
मूर्ती ती सजलेली,
अंतरी गाभाऱ्यात
पोकळी फार झाली....

संजय सावळे