प्रस्तावना
जगाच्या पाठीवर अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्या अॅपमध्ये सादर करण्यात आलेली माहिती देखील अनेक संकेतस्थळांवर बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, अनेकदा आपल्याला अशा व्यक्तिमत्वांची माहिती हवी असते तेव्हा ती उपलब्ध नसते, कमी प्रमाणामध्ये असते किंवा इंग्रजीमध्ये उपलब्ध असते. यावर उपाय म्हणून अभिषेक ज्ञानेश्वर ठमके (डोंबिवली), अक्षर प्रभू देसाई (न्यूयॉर्क) आणि अदिती नायर (ठाणे) जय महाराष्ट्र या अॅपची निर्मिती केली. यामध्ये आपल्याला शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांपासून ते संत, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक, समाजसेवक, राजकीय नेते, विचारवंत व संशोधक, उद्योजक, कलाकार, खेळाडू, पत्रकार अशा विविध क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर ठसा उमटविणाऱ्या मराठी व्यक्तिमत्वांची माहिती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे अॅप सतत अपडेट असेल आणि कालानुक्रमे यामध्ये नव्या नावांची भर देखील पडत जाईल.
आपल्याला हे अॅप आवडल्यास गुगल प्ले स्टोरवर आपल्या प्रतिक्रया नक्की द्या व अॅपबद्दल इतरांना देखील सांगा.