Get it on Google Play
Download on the App Store

धडपडणारी मुले 74

“नामदेव, रघुनाथ! किती सांगू, किती बोलू? हें हृदयमंथन आहे. अमृतसिद्धां होईपर्यंत हें मंथन सुरु ठेवावयाचें. दैवी व आसुरी वृत्ति या हृदयसिंधूचें मंथन करी असतात. कधी विष बाहेर पडतें; कधी मंदिरा, कधी मंदिराक्षी: कधी लक्ष्मी तर कधी शंख; कधी कौस्तुभ तर कधी चाबूक! परंतु घाबरू नये, शेवटी अमृत बाहेर पडेल. मातींतून आपणांस अमरता मिळवावयाची आहे, अंधारांतून प्रकाश मिळवावयाचा आहे, नरकांतून स्वर्ग निर्मावयाचा आहे! हे मानवी भाग्य आहे! देवानें मानवाला हें महान कर्म दिलें आहे! एक दिवस हें कर्म साधेल. जीवनाची कळी फुलेल, फुलेल!”
असें म्हणून स्वामीनीं एक गोड अभंग म्हटला.
‘संपोनिया निशा, उजळते प्रभा,
दिनमणी उभा, नभोभागी,
लाखों मुक्या कळ्या, त्या तदा हांसती,
खुलती डुलती, आनंदाने.
ऊर्ध्वमुख होती, देव पाहाताती,
गंधधूपारती, ओंवाळीती,
तैसे माझे मन, येतांचि प्रकाश,
पावेल विकास, अभिनव.
तोंवरि तोंवरि, अंधारी राहीन,
दिन हे नेईन, आयु्याचे.
जीवनाची कळी, फुले केव्हा तरी.
आशा ही अंतरी, बाळगीतों || स.||

सूर्य मावळत होता. पांखरें घरट्यांत जात होती, इतरांना ‘चला चला’ हाका मारीत होती. क्रीडांगणावर मुलें हसंत होती, खेळत होती. विहिरीला हल्या जोडण्यांत आला. म्हशींची दुधे छात्रालयाचे गडी काढू लागले. नामदेव व रघुनाथ स्वामींजवळ आहेत. दूध पीत आहेत, अमृत पीत आहेत. अभंग म्हणतां म्हणतां स्वामींनी डोले मिटले होते. नामदेव व रघुनात त्यांच्याकडे पाहात होते. संध्यासमय़ींचा रक्तिमा खिडकींतून आंत आला होता! पवित्र प्रकाश तेथें पसरला होता!
छात्रालयाची भोजनघंटा झाली. मुकें, परंतु हृदये भरून आलेले नामदेव व रघुनाथ उठून गेले.

अंथरुणांत पडल्या पडल्या वाचीत असत. त्यांची आवडती पुस्तके त्यांच्या आजूबाजूला असत. ज्ञानेश्वरी, व्हिटमनचीं तृणपणें, गटेचे फौस्ट, मॅझिनीची कर्तव्ये – तेथें पडलेली होती. नामदेव व रघुनाथ आले म्हणजे त्यांना चांगले उतारे वाचून दाखवीत. ‘नम: पुरस्तात् अथ पृष्ठतस्ते’ या गीतेंतील अकराव्या अध्यायांतील श्लोकावरील ओंव्या ते वाचून दाखवीत व तन्मय होत. किंवा नवव्या अध्यायांतील ‘महात्मानस्तु मां पार्थ’ या श्लोकांवरील ओंव्या वाचीत!’

एके दिवशी नामदेवानें विचारलें, “तुमच्या कविता कोठें आहेत? परवांचा अभंग तुमचाच आहे. होय ना?”

धडपडणारी मुले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
धडपडणारी मुले 1 धडपडणारी मुले 2 धडपडणारी मुले 3 धडपडणारी मुले 4 धडपडणारी मुले 5 धडपडणारी मुले 6 धडपडणारी मुले 7 धडपडणारी मुले 8 धडपडणारी मुले 9 धडपडणारी मुले 10 धडपडणारी मुले 11 धडपडणारी मुले 12 धडपडणारी मुले 13 धडपडणारी मुले 14 धडपडणारी मुले 15 धडपडणारी मुले 16 धडपडणारी मुले 17 धडपडणारी मुले 18 धडपडणारी मुले 19 धडपडणारी मुले 20 धडपडणारी मुले 21 धडपडणारी मुले 22 धडपडणारी मुले 23 धडपडणारी मुले 24 धडपडणारी मुले 25 धडपडणारी मुले 27 धडपडणारी मुले 28 धडपडणारी मुले 29 धडपडणारी मुले 30 धडपडणारी मुले 31 धडपडणारी मुले 32 धडपडणारी मुले 33 धडपडणारी मुले 34 धडपडणारी मुले 35 धडपडणारी मुले 36 धडपडणारी मुले 37 धडपडणारी मुले 38 धडपडणारी मुले 39 धडपडणारी मुले 40 धडपडणारी मुले 41 धडपडणारी मुले 42 धडपडणारी मुले 43 धडपडणारी मुले 44 धडपडणारी मुले 45 धडपडणारी मुले 46 धडपडणारी मुले 47 धडपडणारी मुले 48 धडपडणारी मुले 49 धडपडणारी मुले 50 धडपडणारी मुले 51 धडपडणारी मुले 52 धडपडणारी मुले 53 धडपडणारी मुले 54 धडपडणारी मुले 55 धडपडणारी मुले 56 धडपडणारी मुले 57 धडपडणारी मुले 58 धडपडणारी मुले 59 धडपडणारी मुले 60 धडपडणारी मुले 61 धडपडणारी मुले 62 धडपडणारी मुले 63 धडपडणारी मुले 64 धडपडणारी मुले 65 धडपडणारी मुले 66 धडपडणारी मुले 67 धडपडणारी मुले 68 धडपडणारी मुले 69 धडपडणारी मुले 70 धडपडणारी मुले 71 धडपडणारी मुले 72 धडपडणारी मुले 73 धडपडणारी मुले 74 धडपडणारी मुले 75 धडपडणारी मुले 76 धडपडणारी मुले 77 धडपडणारी मुले 78 धडपडणारी मुले 79 धडपडणारी मुले 80 धडपडणारी मुले 81 धडपडणारी मुले 82 धडपडणारी मुले 83 धडपडणारी मुले 84 धडपडणारी मुले 85 धडपडणारी मुले 86 धडपडणारी मुले 87 धडपडणारी मुले 88 धडपडणारी मुले 89 धडपडणारी मुले 90 धडपडणारी मुले 91 धडपडणारी मुले 92 धडपडणारी मुले 93 धडपडणारी मुले 94 धडपडणारी मुले 95 धडपडणारी मुले 96 धडपडणारी मुले 97 धडपडणारी मुले 98 धडपडणारी मुले 99 धडपडणारी मुले 100 धडपडणारी मुले 101 धडपडणारी मुले 102 धडपडणारी मुले 103 धडपडणारी मुले 104 धडपडणारी मुले 105 धडपडणारी मुले 106 धडपडणारी मुले 107 धडपडणारी मुले 108 धडपडणारी मुले 109 धडपडणारी मुले 110 धडपडणारी मुले 111 धडपडणारी मुले 112 धडपडणारी मुले 113 धडपडणारी मुले 114 धडपडणारी मुले 115 धडपडणारी मुले 116 धडपडणारी मुले 117 धडपडणारी मुले 118 धडपडणारी मुले 119 धडपडणारी मुले 120 धडपडणारी मुले 121 धडपडणारी मुले 122 धडपडणारी मुले 123 धडपडणारी मुले 124 धडपडणारी मुले 125 धडपडणारी मुले 126 धडपडणारी मुले 127 धडपडणारी मुले 128 धडपडणारी मुले 129 धडपडणारी मुले 130 धडपडणारी मुले 131 धडपडणारी मुले 132 धडपडणारी मुले 133 धडपडणारी मुले 134 धडपडणारी मुले 135 धडपडणारी मुले 136 धडपडणारी मुले 137 धडपडणारी मुले 138 धडपडणारी मुले 139 धडपडणारी मुले 140 धडपडणारी मुले 141 धडपडणारी मुले 142 धडपडणारी मुले 143 धडपडणारी मुले 144 धडपडणारी मुले 145 धडपडणारी मुले 146 धडपडणारी मुले 147 धडपडणारी मुले 148 धडपडणारी मुले 149 धडपडणारी मुले 150 धडपडणारी मुले 151 धडपडणारी मुले 152 धडपडणारी मुले 153 धडपडणारी मुले 154 धडपडणारी मुले 155 धडपडणारी मुले 156 धडपडणारी मुले 157 धडपडणारी मुले 158 धडपडणारी मुले 159 धडपडणारी मुले 160 धडपडणारी मुले 161 धडपडणारी मुले 162 धडपडणारी मुले 163 धडपडणारी मुले 164 धडपडणारी मुले 165 धडपडणारी मुले 166 धडपडणारी मुले 167 धडपडणारी मुले 26 शेतकरी जगाचा पोशिंदा