धडपडणारी मुले 93
“आज तुम्ही कशावर बोलणार आहात?” नामदेवानें विचारलें.
“तुझ्यावर,” स्वामी म्हणाले.
“आणि माझ्यावर नाही?” रघुनाथनें विचारलें.
“सांगा, ना?” त्याचा अर्थ नाही कळला?” स्वामींनी विचारलें.
“नाही,” दोघे एकदम म्हणाले
“फुकट तुम्ही, कांही प्रतिभा नाहीच तुम्हाला खानदेशी रे खानदेशी स्वामी थट्टा करीत म्हणाले.
“खानदेशचें अन्न खाऊन खानदेशला निदता का ?” रघुनाथनें विचारलें.
“नेहमीं तर खानदेशची स्तुति करता, आजच का बरें हे वंदनिंदन हा पूज्यपूजाव्यतिक्रम?” नामदेवानें विचारलें.
“अरे, तुझ्यावर म्हणजे कलेवर. तू म्हणजे मूर्तिमंत कला,” स्वामी म्हणाले.
“मला समोर पाहून तुम्हाला स्फूर्ति येईल, तुमच्या प्रतिभेला पल्लक फुटतील, विचाराचे भुंगे गू गू करीत तुमच्याकडे येतील, होय ना?” नामदेवानें विचारलें.
“तुला समोर पाहून डोळे मिटतील, ओठं मुके होतील, वाचा पांगुळेल, विचार पळेल, तुला समोर पाहून प्रतिभेचे पंख मिटलेले राहातील, कल्पना शांत होईल,” स्वामी म्हणाले,
“नामदेव! तू तर मग व्याख्यानाला येऊच नकोस,” रघुनाथ म्हणाला.
“मी कोठे तरी दूर बसेन, दिसणार नाही असा ठिकामी बसेन,” नामदेव म्हणाला.
“परंतु स्वामीचें डोळे तुला हुडकत राहातील, आणि असून न दिसलास तरीहि ते डोळें मिटतील. मुलें टाळ्या पिटतील, शिट्या फुकतील खानदेशची फजिती होईल. अमळनेरचें नांव जाईल,” रघुनाथ म्हणाला.
“किती वेळ आपण जेवतों तरी पोट भरत नाही. तुम्ही आम्हांला उपाशीच ठेवणार?” नामदेव म्हणाला.
“मग आधीं का रे नाही जेवू घेतलेस?” स्वामीनीं विचारलें.
“तु्म्ही नसता तेव्हा पोट आधींच भरलेलं असतें. आमचें तुमच्या उलट आहे. तुमचें आम्हांला पाहून पोट भरलें. आमचें तुम्हाला पाहून पोट रिकामें झालें. तुम्ही नसता तेव्हा एकेक घांस आम्ही कळेंच गिळीत असतो. तुमच्या थोड्या फार आठवणी जेव्हा आम्ही काढतों, तेव्हा मग चार घांस चटाचट जातात,” नामदेव म्हणाला.