पाकोळी आणि कावळा
एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून भांडत होते. बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,'
तात्पर्य
- दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे.