मुरलीवाला कोळी
एक कोळी मासे धरण्यापेक्षा मुरली वाजविण्यात फार कुशल होता. एके दिवशी तो नदीकाठी जाऊन मुरली वाजवीत बसला. मुरलीच्या आवाजाने एकही मासा वर न आल्याने त्याने मुरली ठेवून दिली व जाळे पाण्यात टाकले. थोड्याच वेळात पुष्कळ मासे त्या जाळ्यात सापडले. ते पाहून तो कोळी म्हणाला, ' हे मासे किती अरसिक ! इतका वेळ मी मुरली वाजवत होतो तेव्हा तिच्या सुरांवर हे नाचले नाहीत आणि आता मुरली वाजवणं बंद केल्यावर हे नाचू लागले.