पारधी आणि पारवा
एकदा एक पारवा एका पिंपळाच्या झाडावर बसला होता. इतक्यात त्याला मारण्यासाठी एक पारधी आला व त्याने पारव्याच्या दिशेने बंदूक रोखली व आता तो नेम धरून गोळी सोडणार इतक्यात झाडाच्या पायथ्याशी असलेला एक साप त्याला कडकडून चावला. हळूहळू विष अंगात चढू लागले. तेव्हा त्याने बंदूक फेकून दिली व तो म्हणाला, 'दुसर्याला मारण्यासाठी मी तयार झालो असतांना माझाच प्राण गेला. जशास तसंच झालं.'